Skip to main content

गाव पातळीवर करा हे BUSINESS कमवा लाखो रुपये

गाव पातळीवर करा हे BUSINESS कमवा लाखो रुपये.

   ग्रामीण भाग असेल तर त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार असणारे तरुण गाव पातळीवरच BUSINESS चालू करून स्वतः च मासिक उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो .असे कोणते व्यवसाय आहेत जे ग्रामीण भागात करता येतील ते खालीलप्रमाणे सांगता येतील.

कमी भांडवलीचे व्यवसाय

1) आपले सरकार सेवा केंद्र 
       गाव पातळीवरच आपले सरकार सेवा केंद्र चालू करून चांगल्या पद्धतीने उत्त्पन्न मिळवू शकतो . यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलयेर दाखला असे प्रमाणपत्र ऑनलाईन आपल्या गाव पातळीवरच चालू करू शकतो .

2) आधार कार्ड सेवा केंद्र
       सध्या आपल्या देशात सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र म्हणजे आधारकार्ड आहे.आणि ही सेवा निरंतर चालणारी सेवा आहे .कारण नविन आधारकार्ड काढणे त्यात दुरुस्ती करणे वारंवार चालूच असते त्यामुळे ग्रामीण पातळीवरच ही सेवा देऊन चांगले उत्पन्न मिळवू शकतो.

3) ग्राहक सेवा केंद्र 
     कोणत्याही बँकेचे मिनी बँक चालू करू शकतो व बँकिंग सेवा आपल्या गाव पातळीवर ही सेवा 24 तास देऊ शकतो .यामध्ये पैसे काढणे ,पैसे भरणे, ट्रान्स्फर करणे, पैसे तपासणे, खाते,खाते उघडणे असे प्रकारचे सेवा प्रदान करून चांगले उत्पन्न मिळवू शकतो.

4)पॅन कार्ड सेवा (PAN CARD)
         ही सेवा ग्राहक सेवा व आधार कार्ड तसेच आपले सरकार सेवा या सेवांसोबत चालू करू शकतो .PAN CARD एजन्सी साठी केवळ 500 ₹ फीस लागते जर ग्राहक सेवा सोबत घेतल्यास कोणतिही फिस लागत नाही.


जास्त भांडवलीचे व्यवसाय

1) पाणी फिल्टरेशन व्यवसाय 
    हा व्यवसाय गाव पातळीवर ही चांगल्या पद्धतीने चालू लागला आहे. हा व्यवसाय उन्हाळ्यात खूप मोठया प्रमाणात चालतो.यासाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध पाहिजे . तसेच पाणी फिल्टरेशन मशीन 3 ते 5 लाख पर्यंत मिळते .हा व्यवसाय चालू करण्यासाठी 5 ते 6 लाख गुंतवणूक करावी लागते. व या व्यवसायातुन मासिक 50000 पेक्षा जास्त उत्त्पन्न मिळवू शकतो .


2) ATM सेवा
    आपला ग्रामीण भाग मोठा असेल बाजारपेठेचे मोठे केंद्र असेल तर त्या ठिकाणी ATM लावून चांगले कमिशन मिळवू शकतो .यामध्ये HITACHI ,मुथुट तसेच टाटा या कंपनी असे ATM फ्रेंचाईजि उपलब्ध करून देतात आपल्या जागेवर ही फ्रेंचाईजि घेऊन चांगल्या पद्धतीने उत्त्पन्न मिळवू शकतो .


Comments