Skip to main content

Posts

Showing posts with the label महागाई भत्ता

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव 3 % महागाई भत्ता कधी मिळणार ?

 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव 3 % महागाई भत्ता कधी मिळणार ? केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 % प्रमाणे महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे .या व्यतिरिक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागील 18 महिने गोठवलेला महागाई भत्ता बाबत वन टाइम सेटलमेंट करावी अशी मागणी केंद्र सरकारसमोर करण्यात आली आहे . राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव महागाई भत्ता व इतर भत्ते लागू करण्यात येतात .केंद्र सरकारने वाढीव 3 % महागाई भत्ता बाबत निर्णय घेतला असून राज्य सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतले नाहीत . राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडून वाढीव महागाई भत्ता व मागील 18 महिने महागाई भत्ता बाबत केंद्राप्रमाणे  वन टाइम सेटलमेंट करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे .त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुध्दा मागील गोठवलेला महागाई भत्ता बाबत लवकर निर्णय घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहेत . याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारकडून सकारात्मक भूमिका मांडत याबाबत डिसेंबर अखेर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे .राज्य सरकार यावर लवकरच निर्णय घेईल आणि केंद्राप्रमाणे वाढीव 3 % मह...

18 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी मिळणार .

 18 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी मिळणार .     राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2021 पासून महागाई भत्ता 28% असा करण्यात आला आहे . ही वाढ 17% वरून 28% अशी करण्यात आली आहे. यामध्ये 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत महागाई भत्त्याचा दर 17 टक्के इतकाच राहणार आहे असा राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. यामध्ये अठरा महिन्याचा महागाई भत्ता थकबाकी रक्कम राज्य शासनाने गोठवल्याने महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमध्य कमालीची नाराजगी व्यक्त केली जात आहे.     केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्याचा महागाई भत्ता गोठल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के महागाई भत्ता देण्यात आला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता 31 टक्के झाला आहे. त्याचबरोबर महागाई भत्ता मधील 11 टक्के वाढ बाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या निर्णयानंतर तीन महिन्याच्या नंतर राज्य शासनाने घेतला आहे.        त्याचबरोबर 01 जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीमधील महागाई भत्ता फरक बाबत अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे राज्य शासकीय व...

बस महामंडळ कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला महागाई भत्ता वाढीची गिफ्ट .

 बस महामंडळ कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला महागाई भत्ता वाढीची  गिफ्ट .     दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बस महामंडळ कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणारी महागाई भत्ता वाढ शेवटी दिवाळी सणाचे औचित्य साधून महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे .     बस महामंडळ मध्ये सुमारे 95 हजार पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत .सध्या बस महामंडळ कर्मचाऱ्यांना 12 % दराने महागाई भत्ता मिळतो .5% महागाई भत्ता वाढीमुळे आता एकूण 17 % महागाई भत्ता झाला आहे .     ही महागाई भत्ता वाढ माहे नोव्हेंबर महिन्यापासून रोखीने मिळणार आहे .त्याचबरोबर बस महामंडळ अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 5000 रुपये तर कर्मचाऱ्यांना 2500 रुपये देण्यात येणार आहे .याबाबची माहीती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे .    बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ झाल्याने बस तिकीट दरामध्ये 5 रुपये दर वाढवण्यात आला आहे .महागाई भत्ता वाढीमुळे बस महामंडळ कर्मचाऱ्यांना आनंद झाला आहे .यामुळे कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री यांचे आभार मानले .

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीण 3% वाढ .

  केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीण 3% वाढ .   केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता मध्ये 11 % वाढ लागू केली होती .यामुळे महागाई भत्ता 28 % झाला होता .केंद्र सरकारने लगेचच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या व निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीन 3 % ने वाढ केली आहे .या वाढीमुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना व केंद्रीय निवृत्तीवेतन धारकांना आता 31 % दर प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे .    केंद्र सरकारने मागील महागाई भत्ता रोखल्यामुळे कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्ता मध्ये 3 % ने वाढ केली आहे .याबाबतची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली .   3 % वाढीव महागाई भत्ता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कधी लागू होणार ?   केंद्र सरकारच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही राज्य शासकीय व निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करेल ,परंतु राज्य सरकारने नुकतेच महागाई भत्ता मध्ये 11 % वाढ केल्याने  ,3% वाढीव महागाई भत्ता बाबतचा निर्णय माहे नोव्हेंबर नंतरच घेतला जाईल .

राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ झाल्याने माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधी मधील कोणकोणते फरक मिळणार ?

 राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ झाल्याने माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधी मधील कोणकोणते फरक मिळणार ?     महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 1 जुलै 2021 पासून 28 % दराने लागू करण्यात आला आहे .हा महागाई भत्ता ऑक्टोबर च्या वेतन देयकसोबत रोखीने लागू करण्यात येणार आहे .परंतु माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या तीन महिन्यांच्या कालावधी मधील फरक देण्यासाठी नव्याने आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत .    या तीन महिन्यांच्या काळावधीमधील कोणकोणते फरक मिळणार आहेत ,ते पाहूया . 1) महागाई भत्ता वाढल्याने महागाई भत्ता 11 % वाढीव महागाई भत्ता फरक मिळणार आहे . 2) दि .05/02/2021 रोजीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता 25 % पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्ता मध्ये वाढ नियोजित आहे .ही वाढ अनुक्रमे शहराच्या वर्गवारीनुसार 27%,18%,9% अशी वाढ झाल्याने हा फरक मिळणार आहे . 3)त्याचबरोबर महागाई भत्ता वाढल्याने ज्या कर्मचाऱ्यांना NPS योजना लागू आहे .अशा कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये NPS /DCPS फरक कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार...

दिवाळी सणाला भेटणार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्याचे गिफ्ट.

  दिवाळी सणाला भेटणार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्याचे गिफ्ट.   राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला भेटणार महागाई भत्त्याचे गिफ्ट. महाराष्ट्र राज्य सरकार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या अगोदरच महागाई भत्ता मध्ये वाढ करून कर्मचाऱ्यांना खूश करणार आहे .महागाई भत्ता मध्ये 11 टक्के वाढ या दिवाळी सणाच्या सुरुवातीपासून म्हणजेच नोव्हेंबर पासून नियमित वाढ लागू करण्यात येईल. याबाबतचा निर्णय दिवाळी सणाच्या अगोदर घेतला जाणार आहे.     राज्य सरकारच्या मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीमध्ये महागाई भत्ता वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आले .आहे माननीय मुख्य सचिवांनी महागाई भत्ता मध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री कडे सादर केला आहे .या प्रस्तावावर विधिमंडळामध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात निर्णय घेतला जाणार आहे .या प्रस्तावामध्ये महागाई भत्ता 11 टक्के वाढ करण्याची व बक्षी समिती खंड 1 मधील त्रुटींवर पुनर्विचार करण्यात येणार आहे .      महागाई भत्ता वाढ सर्व शासकीय ,जिल्हा परिषद तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे .त...