Skip to main content
दिवाळी सणाला भेटणार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्याचे गिफ्ट.
दिवाळी सणाला भेटणार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्याचे गिफ्ट.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला भेटणार महागाई भत्त्याचे गिफ्ट. महाराष्ट्र राज्य सरकार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या अगोदरच महागाई भत्ता मध्ये वाढ करून कर्मचाऱ्यांना खूश करणार आहे .महागाई भत्ता मध्ये 11 टक्के वाढ या दिवाळी सणाच्या सुरुवातीपासून म्हणजेच नोव्हेंबर पासून नियमित वाढ लागू करण्यात येईल. याबाबतचा निर्णय दिवाळी सणाच्या अगोदर घेतला जाणार आहे.
राज्य सरकारच्या मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीमध्ये महागाई भत्ता वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आले .आहे माननीय मुख्य सचिवांनी महागाई भत्ता मध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री कडे सादर केला आहे .या प्रस्तावावर विधिमंडळामध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात निर्णय घेतला जाणार आहे .या प्रस्तावामध्ये महागाई भत्ता 11 टक्के वाढ करण्याची व बक्षी समिती खंड 1 मधील त्रुटींवर पुनर्विचार करण्यात येणार आहे .
महागाई भत्ता वाढ सर्व शासकीय ,जिल्हा परिषद तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे .त्याचबरोबर राज्यातील सर्व महामंडळे मधील कर्मचाऱ्यांनाही विलंब न करता वाढीव महागाई भत्ता त्वरित लागू करण्यात येणार आहे.
तसेच निवृत्ती वेतन धारकांना वाढीव महागाई भत्ता त्वरित लागू करण्यात येणार असून 01 जुलै 2021 पासूनचा फरक तात्काळ अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment