Skip to main content

18 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी मिळणार .

 18 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी मिळणार .

    राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2021 पासून महागाई भत्ता 28% असा करण्यात आला आहे . ही वाढ 17% वरून 28% अशी करण्यात आली आहे. यामध्ये 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत महागाई भत्त्याचा दर 17 टक्के इतकाच राहणार आहे असा राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. यामध्ये अठरा महिन्याचा महागाई भत्ता थकबाकी रक्कम राज्य शासनाने गोठवल्याने महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमध्य कमालीची नाराजगी व्यक्त केली जात आहे.



    केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्याचा महागाई भत्ता गोठल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के महागाई भत्ता देण्यात आला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता 31 टक्के झाला आहे. त्याचबरोबर महागाई भत्ता मधील 11 टक्के वाढ बाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या निर्णयानंतर तीन महिन्याच्या नंतर राज्य शासनाने घेतला आहे. 

      त्याचबरोबर 01 जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीमधील महागाई भत्ता फरक बाबत अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे राज्य शासकीय व निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी व्यक्त केली जात आहे .अनेक राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाचा थकबाकी चा पहिला व दुसरा हप्ता अद्याप पर्यंत मिळाला नाही. 

    केंद्राप्रमाणे वाढीव तीन टक्के महागाई भत्ता देण्यात यावे .अथवा मागील 18 महिन्यांची महागाई भत्ता फरक मिळावा. यासाठी विविध राज्य शासकीय कर्मचारी संघटना मार्फत राज्य शासनाकडे निवेदने देण्यात आले आहेत .

Comments