Skip to main content

बस महामंडळ कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला महागाई भत्ता वाढीची गिफ्ट .

 बस महामंडळ कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला महागाई भत्ता वाढीची  गिफ्ट .

    दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बस महामंडळ कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणारी महागाई भत्ता वाढ शेवटी दिवाळी सणाचे औचित्य साधून महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे .

    बस महामंडळ मध्ये सुमारे 95 हजार पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत .सध्या बस महामंडळ कर्मचाऱ्यांना 12 % दराने महागाई भत्ता मिळतो .5% महागाई भत्ता वाढीमुळे आता एकूण 17 % महागाई भत्ता झाला आहे .

    ही महागाई भत्ता वाढ माहे नोव्हेंबर महिन्यापासून रोखीने मिळणार आहे .त्याचबरोबर बस महामंडळ अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 5000 रुपये तर कर्मचाऱ्यांना 2500 रुपये देण्यात येणार आहे .याबाबची माहीती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे .

   बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ झाल्याने बस तिकीट दरामध्ये 5 रुपये दर वाढवण्यात आला आहे .महागाई भत्ता वाढीमुळे बस महामंडळ कर्मचाऱ्यांना आनंद झाला आहे .यामुळे कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री यांचे आभार मानले .

Comments