Skip to main content
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीण 3% वाढ .
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीण 3% वाढ .
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता मध्ये 11 % वाढ लागू केली होती .यामुळे महागाई भत्ता 28 % झाला होता .केंद्र सरकारने लगेचच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या व निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीन 3 % ने वाढ केली आहे .या वाढीमुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना व केंद्रीय निवृत्तीवेतन धारकांना आता 31 % दर प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे .
केंद्र सरकारने मागील महागाई भत्ता रोखल्यामुळे कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्ता मध्ये 3 % ने वाढ केली आहे .याबाबतची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली .
3 % वाढीव महागाई भत्ता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कधी लागू होणार ?
केंद्र सरकारच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही राज्य शासकीय व निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करेल ,परंतु राज्य सरकारने नुकतेच महागाई भत्ता मध्ये 11 % वाढ केल्याने ,3% वाढीव महागाई भत्ता बाबतचा निर्णय माहे नोव्हेंबर नंतरच घेतला जाईल .
Comments
Post a Comment