ठाणे महानगरपालिका मध्ये परिचारिका पदांच्या 52 जागेसाठी भरती
ठाणे महानगरपालिका ,ठाणे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ,छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध पदांसाठी 52 जागेवर परिचारिका (स्टाफ नर्स ) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर भरती प्रक्रिया ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे .
पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
एकूण पद संख्या - 52
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त नर्सिंग कोर्स पूर्ण करून महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सलिंगकडे नाव नोंदणी बंधनकारक आहे .
अनुभव - सरकारी निमसरकारी दवाखान्यात अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल .
वयोमर्यादा - सर्वसाधारण वर्गासाठी वय - 38 वर्षे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे.
वेतन/ मानधन - 20000/-प्रतिमहा मानधन दिले जाईल .
अर्ज सादर करण्याची पद्धत - अर्ज ऑनलाइन पद्धतीने दि.15/03/2021 ते दि.20/03/2021 पर्यंत भरता येईल .ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील PDF मध्ये लिंक देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment