Skip to main content

B.com /M.com नंतर सरकारी नौकरीसाठीच्या संधी .

 B.com /M.com नंतर सरकारी नौकरीसाठीच्या संधी .

   अनेक विद्यार्थी B. COM /M. COM करतात परंतु शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेकवेळा त्यांना हवा तसा जॉब मिळत नाही. किंबहुना हवे तसे वेतन मिळत नाहीत. त्यामुळे अनेकजण स्पर्धा परीक्षाकडे वळतात .स्पर्धा परीक्षामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा असते .त्यामुळे अश्या स्पर्धेत टिकणे साहजिकच शक्य नसते परंतु आपल्याच अभ्यासक्रमशी निगडित अभ्यासक्रम असल्यास त्यामध्ये लवकर यश संपादन करू शकतो. B.com/M.com केल्यानंतर वाणिज्य शाखेशी निगडित असणाऱ्या सरकारी नौकरी कोणत्या आहेत ते पाहुयात .




1) सांख्यिकीय  अन्वेषक  ( statistical investigator's)
      हे पद शासकीय कार्यालयात भरले जाते या पदासाठी असणारी पात्रता ही वाणिज्य शाखेतील पदवी असणे आवश्यक असते .कामाचे स्वरूप हे सांख्यिकी कामकाज करणे असते .या पदासाठी वाणिज्य शाखेतीलच उमेदवार आवश्यक असल्याने B.com/M.com नंतर या पदासाठी तयारी करायला हवी .तसेच हे पद ही प्रतिष्ठित आहे.अतिरिक्त पात्रता मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


2) कर सहाय्यक (TAX ASSISTANT )
      कर सहाय्यक या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही क्षेत्राततुन 12 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. परंतु या पदासाठी असणारा जास्त प्रमाणात 50%अभ्यासक्रम हा वाणिज्य शाखेतील पुस्तकपालन व लेखाकर्म (book keeping and accountancy) या विषयाशी निगडित असल्याने वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना हे पद मिळवणे सहज शक्य आहे.

3) लेखापरीक्षक ( AUDITOR )
     या पदासाठी वाणिज्य शाखेतील B.COM/M.COM पडविमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .यासाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येते .परंतु स्पर्धा कमी असल्याने यश संपादन करणे सहज शक्य आहे .

4)गट प्रवर्तक
     हे पद सध्या सरकार कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे. या पदासाठी वाणिज्य शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. इतर पात्रता मराठी व इंग्रजी टंकलेखन कोर्सेस उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच संगणक हाताळनी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच tally कोर्स उत्तीर्ण आवश्यक आहे.

5) बँकिंग क्षेत्र -
      IBPS च्या परीक्षा देऊन बँकींग क्षेत्रातील नौकरी मिळवू शकतो वाणिज्य शाखेतील विद्यार्थीच बँकिंगच्या परीक्षेकडे वळतात . IBPS च्या परीक्षा देऊन बँकिंग क्षेत्रांतील चांगले पद मिळवू शकता.शिवाय वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील विशेष आवड असल्याने यश लवकर संपादन करू शकतात .

खाजगी क्षेत्रातील संधी-
     मॅनेजर, accountant,मॅनेजिंग ऑफिसर ,कॅशियर, प्रोजेक्ट मॅनेजर, tax investigator, तसेच चार्टर अकाउंटंट कडे जॉबची संधी मिळेल. तसेच DTL कोर्स करून स्वतः चा टॅक्स कन्सल्टंट व्यवसाय सुरू करू शकता.
    

Comments