Skip to main content
महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र राज्याच्या समाजकल्याण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत असून लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.
1)पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती -
इयत्ता 5 वि मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते .ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी एक परीक्षा घेतली जाते परीक्षेमध्ये उच्च गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल .
2)पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती-
इयत्ता 8 वि मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते .ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी एक परीक्षा घेतली जाते परीक्षेमध्ये उच्च गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल .
3)सावित्रीबाई फुले कन्या शिष्यवृत्ती -
इयत्ता 1 ली ते 10 पर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या मुलींनाच या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येतो.वार्षिक ₹800/-विद्यावेतन मिळते.
4)महाराष्ट्र टॅलेंट सर्च -
इयत्ता 8 वि मध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येतो .ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी एक परीक्षा घेतली जाते परीक्षेमध्ये उच्च गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल .
5)भारत सरकार शिष्यवृत्ती -
इयत्ता 11 वि ते पदवित्तर पदवी पर्यंत ही शिष्यवृत्ती मिळते शिष्यवृत्ती योजनाची रक्कम ₹ 850/- प्रतिवर्षी विद्यावेतन मिळते.
अटी शर्ती - विद्यार्थी हा मागासवर्गीय ,अनुसूचित जाती, जमाती तसेच नॉन क्रेमिलियर मध्ये मोडत असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्ती योजनाचा लाभ घेता येईल.
6) सेन्ट्रल सेक्टर शिष्यवृत्ती -
पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येतो.ह्या शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात ही नरेंद्र मोदींनी केली असून या शिष्यवृत्ती योजनाचा लाभ घेण्यासाठी 12 वि मध्ये उच्च गुणवत्ता धारण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्ती योजनाचा लाभ घेता येतो.
शिष्यवृत्ती योजनेचे स्वरूप -
पदवीसाठी ₹10000/- प्रति वर्षे
पदवित्तर पदवीसाठी ₹20000/-प्रति वर्षे
पात्रता -12 वि मध्ये उच्च गुणवत्ता धारण करून पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी.
Comments
Post a Comment