Skip to main content

सरकारी /निमसरकारी/महामंडळ नौकरी यामध्ये फरक काय आहे .वाचा .

 सरकारी /निमसरकारी/महामंडळ नौकरी यामध्ये फरक काय आहे .वाचा.

   सरकारी/निमसरकारी/महामंडळ यामधील वाणिज्य भाषेतील फरक म्हणजे यामधील सरकारची असणारी भागीदारी म्हणजेच सरकारने केलेल्या गुंतवणूकेचे प्रमाण सरकारी नौकर ,निमसरकारी नौकर/निमसरकारी नौकर यामध्ये मोठा फरक असतो.
   सरकारी भागामध्ये सरकारचे संपूर्ण वर्चस्व असते उदा. सरकारी शाळा, जिल्हा परिषद,जिल्हा प्रशासन इत्यादी. निमसरकारी यामध्ये सरकारचे गुंतवणूक हे 51% असते. याचे व्यवस्थापण ही सरकार मार्फत केले जाते .महामंडळ हे खाजगी स्वरूपात कंत्राट दिलेले असतात परंतु यामध्ये सरकारची गुंतवणूक ही 50% असते. व्यवस्था पण खाजगी कंत्राट मार्फत केले जाते.

सरकारी /निमसरकारी/महामंडळ नौकरी यामध्ये फरक काय आहे ?

1)सरकारी तसेच निमसरकारी यामध्ये कर्मचाऱ्यांना सारखाच वेतन मिळतो परंतु महामंडळ कर्मचाऱ्यांना वेतन किंबहुना वेतनाचे प्रमाण थोड्या प्रमाणात कमी असते.

2)सरकारी नौकारी जास्त जोखिम स्वरूपाची असते .कारण अश्या नौकारी ह्या जास्त जबाबदारीचे असतात .म्हणूनच यांना थोड्या प्रमाणात वेतन व भत्ते जास्त असते .निमसरकारी व महामंडळ कर्मचाऱ्यांची यांची जबाबदारी सरकारी कर्मचारीच्या तुलनेने कमी असते .

3) सरकारी नौकर त्यांना दिलेल्या कामाशी प्रत्यक्ष जबाबदार असतात. परंतु निमसरकार व महामंडळ यामध्ये वरीष्ठ अधिकारी च जबाबदार असतात .

4)कामाचा ताण हा सर्व कर्मचाऱ्यांवर त्या कामाच्या स्वरूपानुसार कामाचा ताण कमी जास्त प्रमाणात आहे .परंतु काही महामंडळ आहेत जसे बस महामंडळ ,महाराष्ट्र सुरक्षा बल या कर्मचाऱ्यांवर शारीरिक कामकाज असल्याने कामाचा ताण जास्त आहे.

5)अधिक वेळ कामकाजाचा मोबदला (overtime)-
        सरकारी /निमसरकारी यामध्ये याची सध्या तरी तरतूद नाही .परंतु महामंडळ मध्ये अधिक कामाचा मोबदला मिळतो. उदा. दिवाळीच्या दिवसात बस महामंडळ मधील कर्मचारी सुट्टी च्या दिवशी अधिक वेळ काम करतात .याचा मोबदला त्यांना मिळतो.

6)नौकारीची हमी - आजकालच्या विद्यार्थ्यांना जास्त सरकारी नौकारीच हवी असते.कारण इतर नौकरीच्या तुलनेत नौकारीची हमी यामध्ये जास्त असते.


Comments

  1. विज महामंडळ कर्मचारी यांना पेन्शन देण्याची जबाबदारी संपूर्णपणे शासनाची आहे की विज महामंडळाची

    ReplyDelete

Post a Comment