Skip to main content
श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना नवीन अटी शर्ती.
श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना नवीन अटी शर्ती.
योजनेचे नाव - श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना असे आहे.
केंद्र /राज्य वाटा - 33%म्हणजे 200 रुपये केंद्र सरकार द्वारे तर 66%म्हणजे 400 रुपये राज्य सरकार अनुदान असे एकूण 600 /-मासिक निवृत्तीवेतन पात्र लाभार्थ्यांना मिळते.
योजना लाभार्थी साठी आवश्यक अटी व शर्ती /पात्रता-
1)लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
2)लाभार्थीचे वय 65 वर्ष व त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
3)लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न 21000 /- किंवा त्यापेक्षा जास्त असू नये किंवा लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे -
1) आधारकार्ड
2)रेशनकार्ड
3)राष्ट्रीयीकृत बँकेचे बँक पासबुक
4)वयाचा सरकारी वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला
5)तलाठी ,ग्रामसेवक ,सरपंच यांचा दाखला
संपर्क - संबंधित तलाठी कार्यालय .
या योजनेचा लाभ राज्य शासनाकडून देण्यात येत असून केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना तर्फे 200 रुपये तर राज्य सरकार तर्फे 400 रुपये अनुदान मिळते .
Comments
Post a Comment