घरी बसून करता येणारे व्यवसाय.
आजच्या काळात घरी बसूनही अनेक व्यवसाय करणे शक्य आहे .व या व्यवसायातुन चांगली कमाई करू शकतो .आजचे इंटरनेटचे युग असल्याने बहुतेक गोष्टी ऑनलाइन होतात .शहरी भागात तर बहुतांश गोष्टी ह्या इंटरनेटशी जोडलेल्या असतात . याचाच फायदा घेऊन अनेकजण स्वतः चे कमाई करण्याचे साधन शोधले आहेत . तुम्हीही याचा फायदा घेऊन कमाई करू शकता .तसेच घरी बसून काही व्यवसायही करणे शक्य आहेत . ज्यातून चांगला नफाही कमावू शकतो . असेच काही व्यवसाय आहेत ,जे घरी बसून गृहिणी तसेच घरी बसून करता येतील .
1) टिफिन / मेस -
आजकालच्या युगात ह्या व्यवसायामध्ये 50% नफा कमाई करू शकतो . शहरी भागात या व्यवसायाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे . हे व्यवसाय घरी बसूनही तसेच ग्रामीण भागातूनही करू शकतो .टिफिन घरी बसून तयार करून ते मागणी ग्राहकांना घरपोच सुविधा देऊन ह्या व्यवसायातून चांगला नफा कमवू शकतो .टिफिन मध्ये आपल्या रोजच्या मेनू बदल करणे अपेक्षित आहे .जेणेकरून ग्राहक कमी होणार नाही .
2) झोमॅटो (zomato ) apps वर sale करणे .
झोमॅटो सारख्या apps वर आपल्या घरगुती बनवलेले पदार्थ विक्री करू शकतो .यामध्ये चांगला नफाही कमावू शकतो .हा व्यवसाय आपण घरी बसून चिकन बिर्याणी ,चिकन सोप, व्हेज पदार्थ तयार करून झोमॅटो सारख्या apps वर विक्री करू शकतो .यासाठी काही विशेष दुकानाची आवश्यक नाही तसेच काही हॉटेल ची आवश्यक नाही घरी बसून हा व्यवसाय करू शकतो .
3)मास्क बनवणे -
घरीच मास्क तयार करून ते दुकानदाराना विक्री करू शकतो .शिवाय ऑनलाइन पद्धतीने अमेझॉन सारख्या apps वर विक्री करू शकतो .जे की सध्या याची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे .
4) Resale -
सध्या प्रसिद्ध असणारे मिशो हे resale करण्यासाठी apps आहे .या apps मध्ये वस्तू share करून दुसऱ्या ग्राहकांना खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करणे ज्यामध्ये आपल्याला आपल्याला जेवढा नफा आवश्यक आहे .तेवढा लावून Resale करु शकतो .यामध्ये गुंतवणूक काहीच करावी लागत नाही .
5) ऑनलाइन माध्यम -
आपण नेहमीच यूट्यूब ,फेसबुक ,ऑनलाइन काही लेख वाचत किंवा पाहत असतोच .याचाच वापर करून आपण घरी बसून आपल्या मध्ये कला गुणांना वाव देऊन काही कमाई करू शकतो .युट्युब वर स्वतःचा चॅनेल तयार करून तसेच तेच विडिओ फेसबुकवर अपलोड करून कमाई करू शकतो तसेच आपली स्वतः ची वेबसाईट तयार करून त्यातून कमाई करू शकतो .कमाई करण्यासाठी ऍडसेन्स आपल्या चॅनेल वर अप्रूअल मिळणे आवश्यक असते .
Comments
Post a Comment