Skip to main content

आपण पृथ्वीवरून चंद्राची दूसरी बाजु का पाहु शकत नाही ?

 आपण पृथ्वीवरून चंद्राची दूसरी बाजु का पाहु शकत नाही ? 

   आपण चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून पाहू शकत नाही .पृथ्वीचा एकमेव उपग्रह हा चंद्र असून तो पृथ्वीला लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करीत असतो . पृथ्वीला स्वतः  भोवती परिवलन करण्यासाठी 23 तास 56 मिनिटे 4 सेकंद एवढा वेळ लागतो तर परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वी ला 365 दिवस 6 तास अधिकचे लागतात .पुथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वे या दिशेत परिवलन करत असते.
   तसेच चंद्र पुथ्वी भोवती परिभ्रमण करत करत स्वतः भोवती परिवलन करत असतो .त्याचा परिवलन व परिभ्रमण कालावधी हा सारखाच असल्याने आपल्याला पृथ्वी वरून चंद्राची एकच बाजू पाहायला मिळते .
    चंद्र हा एकमेव पृथ्वी चा उपग्रह असून तो पृथ्वी भोवती परिभ्रमण करत अप्रत्यक्षपणे सुर्यभोवतीही परिभ्रमण करत असतो. चंद्र हा सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे परावर्तन पृथ्वीवर करत असतो.

Comments