महाराष्ट्र राज्य सरकारची केवळ 2% व्याजदराने,25% बीजभांडवल व 25000/-थेट कर्ज योजनाच्या नवे अटी शर्ती नियम.
महाराष्ट्र राज्य सरकारची केवळ 2% व्याजदराने, 25% बीजभांडवल व 25000/-थेट कर्ज योजनाच्या नवे अटी शर्ती नियम.
महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे व्यवसाय करणाऱ्या नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही योजना आहे. ही एक कर्ज योजना असून या योजनेच्या कर्जाचे व्याजदर अत्यल्प आहे. व परतफेडीची मदतही जास्त आहे.
योजनेचे नाव- राज्य सरकार 25%बीजभांडवल किंवा 25000/-थेट कर्ज योजना .
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्या प्रवर्गाचे नाव -
1)विमुक्त जाती (व्ही. जे)
2)भटक्या जमाती (भ. ज)
3)विशेष मागास प्रवर्ग (ओ. बी.सी)
योजनेसाठी प्रमुख अटी व शर्ते-
1) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे किंवा 20 वर्षे कायम महाराष्ट्र राज्यात रहिवास असणे आवश्यक आहे.
2)लाभार्थीच्या वय किमान 18 व कमाल वय 45 असणे आवश्यक आहे.
3)लाभार्थी हा वरील नमूद केलेल्या प्रवर्गातिल असणे आवश्यक आहे.
5)इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज बाकी असू नये.
6)व लाभ घेणाऱ्याचे वार्षिक उत्त्पन्न -1 लाख पर्यंत असावे.
लाभाचे आर्थिक स्वरूप -
25% बीजभांडवल साठी व्यावसायाची प्रकल्प मर्यादा 5 लाखासाठी 4% व्याजदराने 5 वर्ष परतफेडीसाठी कालावधी मिळतो.
25000/-थेट कर्ज योजनेसाठी व्यवसाय प्रकल्प मर्यादा 25000/-कर्ज योजनेसाठी 2%व्याजदराने 4 वर्ष पार्टफेडीसाठी कालावधी मिळतो.
योजनेसाठी आवश्यक कागतपत्रे-
1)उत्पनाचा दाखला
2)जातीचा दाखला
3)आधारकार्ड
4)रेशनकार्ड
5)ज्या जागेत व्यवसाय करणार आहात त्या जागेची मालकी पुरावा/भाडे पावती/करार पावती.
6)2 जामीनदार आवश्यक.
अधिक माहितीसाठी जिल्हा समाजकल्याण कार्यालय,वसंतराव नाईक महामंडळ विभागास भेट द्यावी तेथे अर्ज उपलब्ध होतील.
Comments
Post a Comment