Skip to main content

5 वि ते 10 पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विजाभज /विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना .

5 वि ते 10 पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विजाभज /विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना .

   समाजकल्याण विभागामार्फत माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते .ही योजना केवळ विजाभज / विमाप्र याच प्रवर्गासाठी आहे .

प्रमुख अटी - 

  • वरी नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थी हा विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावा .
  • मागील वर्गाच्या वार्षिक परीक्षेत वर्गामध्ये प्रथम / द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले असावे .
  • विद्यार्थी हा मागील वर्षी त्याच शाळेत शिक्षण घेत असावा किंवा तो ज्या शाळेत शिक्षण घेत होता त्याठिकाणचे प्रथम/द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले गुणपत्रिका .
आर्थिक लाभाचे स्वरूप -
  • 5 वि ते 7 वि पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत प्रथम /द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति महा ₹20 दिले जाते असे ऐकून 10 महिन्यासाठी 200 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते .
  • 8 वि ते 10 वि पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत प्रथम /द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति महा ₹ 40 दिले जाते असे ऐकून 10 महिन्यासाठी 400 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते .
अर्ज करण्याची पद्धत -
 अशा गुणवंत विद्यार्थ्यांचे नावे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाने समाजकल्याण विभागाकडे सादर केले पाहिजे .

Comments