Skip to main content

"माझी कन्या भाग्यश्री योजना " च्या नवीन नियम व शर्ते वाचा सविस्तर.

 "माझी कन्या भाग्यश्री योजना " च्या नवीन नियम व शर्ते वाचा सविस्तर.


 " माझी कन्या भाग्यश्री " ही योजना महाराष्ट्र सरकारच्या विकास विभागामार्फत राबविण्यात येते .या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सबलीकरण असून समाजामध्ये स्त्री -पुरुष लिंग गुणोत्तर समान करणे .ही योजना नवीन अटी व शर्ते नुसार लागू करण्यात आली आहे .ही योजना मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या माता पित्यास आर्थिक स्वरूपात सहाय्य केले जाते.

  • 1 ऑगस्ट 2017 नंतर जन्माला येणाऱ्या मुली या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील .
  • पहिल्या मुलीच्या जन्मानंतर माता पित्याने कुटूंबनियोजन साठी शस्त्रक्रिया केली असल्यास ₹50000/- माता पित्यास आर्थिक सहाय्य केले जाते.
  • पहिली मुलीच्या जन्मानंतर दुसरीही मुलगी जन्माला आली असेल आणि त्यानंतर माता पित्याने कुटूंबनियोजन साठी शस्त्रक्रिया केली असल्यास ₹25000/- माता पित्यास आर्थिक सहाय्य केले जाते.
  • पहिली मुलगी जन्माला आली असेल व त्यानंतर दुसऱ्यांदा जुळ्या मुली जन्माला आली असतील तर असे माता पिता या योजनेसाठी पात्र असतील .
  • पहिल्या मुलीच्या जन्मानंतर 2 वर्षाच्या आत कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
  • दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
लागणारे आवश्यक कागदपत्रे -
1) लाभ घेणारे लाभार्थी हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
2)मुलीचा जन्म दाखला.
3)कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र .

अर्ज करण्याची पध्दत - आपल्या संबंधित ग्रामसेवकांशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी व ग्रामसेवकाकडेच अर्ज उपलब्ध होईल.

Comments