Skip to main content

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाची दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना .

 जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाची दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना .


      जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्यात येते. तसेच शेळीचे गट वाट ही करण्यात येते .या योजनेअंतर्गत लाभ घेतल्यानंतर जनावरे लगेच विकता येणार नसून त्याचे पालन पोषण करणे गरजेचे आहे. पालन पोषणास खाद्यही पुरवले जाते .या योजनेची अटी व शर्ते खालीलप्रमाणे आहेत .



ज्या प्रवर्गासाठी आहे तो प्रवर्ग - लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौध्द असावा .

इतर अटी व शर्ते -
1) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
2)सदर लाभार्थी हा वरी नमुद केल्याप्रमाणे अनुसूचित जाती नवबौद्ध असावा .
3)लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास दि.01/04/2021 नंतर 2 पेक्षा जास्त हयात मुले नसावेत .
4)लाभार्थीमध्ये 33% महिलांचा सहभाग असावा .
5)लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्राधान्य देण्यात येईल .

लाभाचे स्वरूप -
    या योजनेअंतर्गत गायी /म्हैस/संकरित गायी/संकरित म्हैस यापैकी आपल्याला पसंतीप्रमाणे दुधाळ जनावरे लाभास पात्र ठरतील .लाभ घेण्याऱ्यास दोन जनावरांची किंमत प्रत्येकी 40000/- प्रमाणे दोन जनावरे लाभास पात्र होतील. एक जनावर 40000 /-असे दोन जनावरांचे 80000 /- रक्कम लाभास पात्र होइल .यापैकी 75% रक्कम ही अनुदानास पात्र राहील बाकी रक्कम कर्ज स्वरूपात मिळेल .दुधाळ जनावरेंचा योजनेचा लाभ घेण्याऱ्याच्या गावात दूध संकलन केंद्र असणे आवश्यक आहे. किंवा त्या गावात 5 जणांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे जेणेकरून दूध संकलन करणे सोयीचे होईल.

अर्ज करण्याची पद्धत - जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागास भेट द्यावी तेथेच अर्ज उपलब्ध होईल .

Comments