सरळसेवेच्या स्पर्धा परीक्षा ह्या ऑगस्ट /सप्टेंबर या महिन्यातच का होतात वाचा सविस्तर
महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेळा सरळसेवेच्या परीक्षा ह्या ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये होतात याचे काही कारणे आहेत .ते खालीलप्रमाणे सांगता येतील .प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये विविध विभागाच्या वर्ग 3,वर्ग -4 या पदांसाठी सरळसेवेच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येते .ही परीक्षा जुलै महिन्यानंतरच घेण्यात येते या पदांसाठीचे जाहिरात ऑगस्ट/सप्टेंबर या महिन्यातच जास्त करून निघतात .याचे मुख्य कारण म्हणजे शासकीय कर्मचारीची होणारी आंतरजिल्हा बदली यानुसार रिक्त पदांचा अहवाल सादर करावा लागतो .शासकीय कर्मचारीची ही बदली माहिती मे/जून या महिन्यात होतात .त्यामुळे रिक्त पदांचा अहवाल तयार असतो व यानुसारच रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येते .जेणेकरून शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदलीनंतर रिक्त मंजूर पदांवरच भरती प्रक्रिया राबविण्यात येते .म्हणून शासकीय कर्मचारी यांची बदली प्रक्रिया झाल्यानंतरच सरळसेवेच्या अंतर्गत येणाऱ्या स्पर्धा परीक्षा साठी आयोजन ऑगस्ट/सप्टेंबर या महिन्यात केले जाते .तर राज्यसेवा व दुय्यम अराजपत्रित पदांचे दरवर्षी पद भरावेच लागते कारण काही पदे ही पदोन्नतीनेच भरले जाते त्यामुळे राज्यसेवा व दुय्यम अराजपत्रित पदांसाठी दरवर्षी पद भरती केले जाते .परंतु सरळसेवेच्या पदांसाठी केवळ मंजूर रिक्त पदांवरच भरती केले जाते .
Comments
Post a Comment