Skip to main content

अचानक दोन हजार रुपयांच्या नोटा गेल्या कुठे ?

 अचानक दोन हजार रुपयांच्या नोटा गेल्या कुठे ?

   मोदी सरकारने देशामध्ये होणार मोठा भ्रष्टाचार ,काळाबाजार ,बनावट नोटा यावर मात करण्यासाठी मोदी सरकारने अचानक नोट बंदीची घोषणा केली .यामध्ये देशात चलनात असणाऱ्या 500 रुपये व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या यामुळे देशातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला .भ्रष्टाचार कमी झाला परंतु मोदी सरकारने जे प्रचलित असणाऱ्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्या परंतु त्याबदल्यात 2000 रुपयांची नोट चलनात आणली परंतु या नोटा खूप मोठे दुष्परिणाम होते त्यामुळे सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा हळूहळू अर्थव्यवस्था मधून काढून घेतले आहे .

या नोटांचे प्रमुख अयोग्य बाबी /दुष्परिणाम  -
  • लहान आर्थिक व्यवहार करण्यास अडचण निर्माण होत होती.
  • दोन हजारांची नोट तयार करण्यासाठी भारतीय बनावटीचा कागत वापरण्यात आला आहे. हा कागत अत्यंत चांगला आहे परंतु या नोटांचा कलर पाण्यात भिजल्यास कलर निघून जायचा .
  • ही नोट सहज समजण्यास अडचणी निर्माण होत होती त्यामुळे सुरुवातीला भरपूर बनावटीच्या नोटा बाजारात आल्या यामुळे मोठा भ्रष्टाचार झाला .
  • अर्थशास्त्रच्या नियमानुसार 1000 रुपयाची नोट रद्द करून 2000 रुपयाची नोट चलनात आणणे हे चुकीचे होते अर्थतज्ञांनी याबाबत चूक लक्षात आणून दिली आहे .
  • या दोन हजाराच्या नोटांमुळे भ्रष्टाचाराला अधिक वाव मिळाला .
या प्रमुख बाबीमुळे भारत सरकार हळूहळू दोन हजारांच्या नोटा अर्थव्यवस्थेमधून काढून घेत आहे .याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने नोटबंदी केली होती परंतु त्यांना तेवढे काही यश मिळाले नाही याउलट त्यांची अर्थव्यवस्था अधिक बिकट झाली .

Comments