आशा स्वयंसेविका पद भरती ,मानधन माहिती .
ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रामधील महत्वाचे कार्य करणारे महिला कर्मचारी म्हणजे आशा स्वयंसेविका होय .हे पद प्रथम प्रामुख्याने आदिवासी भागात बालमृत्यू दर कमी करण्यासाठी हे पद मंजूर केले होते .परंतु या पदांची गरज सर्वच भागात असल्याचे दिसून आल्याने महाराष्ट्र सरकारने आता सर्व भागात हे पद मंजूर केले आहे .व हे पद प्राथमिक आरोग्य केंद्राशी निगडित असते .परंतु हे पद ग्रामपंचायत पातळीवर कार्यरत असते .ग्रामपंचायत लोकसंख्या नुसार आशा स्वयंसेविका पदांची संख्या ठरविली जाते साधारणपणे 1000 ते 1500 लोकसंख्या मागे 1 स्वयंसेविका पद मंजूर आहे .
पदासाठी पात्रता -
- या पदासाठी उमेदवार ही महिला असणे आवश्यक आहे.
- उमेदवार ही त्या गावातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
- उमेदवार ही त्या गावातील विवाहित महिला असणे आवश्यक आहे.
- उमेदवार ही 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा किमान 25 ते कमाल 40 वर्ष असणे आवश्यक आहे.
- विधवा, आदिवासी, स्वयंसेविका संस्था यांना प्राधान्य देण्यात येईल.
निवड प्रक्रिया -
उपलब्ध जागेनूसार ग्रामसेवकांने ग्रामपातळीवर दवंडी देऊन तसेच ग्राम सूचना फलकावर जाहिरात प्रसिध्द केले पाहिजे .तसेच अर्ज निशुल्क उपलब्ध करून दिले जाते .अर्ज हे ग्रामपंचायत तसेच संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रावर निशुल्क उपलब्ध असते .
गुणदान प्रक्रिया -
1)उच्च शिक्षण =06 गुण
10 वि उत्तीर्ण 0 गुण,12 वि विज्ञान 04 गुण, व पुढील शिक्षणासाठी 2 गुण असे जास्तीत जास्त 06 गुण
2)कामाचा अनुभव =04 गुण
आरोग्य क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास 04 गुण देण्यात येईल.
3)विधवा /परितक्त्या =02 गुण .
4)संभाषण /प्रोत्साहन कौशल्य =02 गुण .
मानधन/वेतन = या पदांसाठी मानधन स्वरूपात कामाचा मोबदला मिळतो .व हे मानधन कामानुसार मोबदला मिळतो .
Comments
Post a Comment