पोलीस पाटील पद भरती , मानधन संपूर्ण माहिती .
प्राचीन काळामध्ये पोलीस पाटील हे प्रशाकीय अधिकारी म्हणून गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी काम करीत असत .व गावातील भांडणे ,तक्रारी गावातच मिटवली जात असत .शिवाय पोलिस पाटील हे पद खूप मानाचे पद समजले जात असत .काही काळानंतर हे पद केवळ गावपूरतेच शिल्लक राहिले होते .शिवाय हे पद वारस स्वरूपानुसार पोलीस पाटील त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलास हे पद भेटायचे .काळानुसार हे पोलीस पाटील यांना मिळणारे मानधन कमी स्वरूपात व वारसा हक्कनुसार मिळत असल्याने या पदाचे महत्त्व खूपच कमी झाले होते .त्यामुळे राज्य सरकारने हे पद आता स्पर्धा परीक्षा घेऊन हे पद भरले जात आहेत ,तसेच मानधन मध्ये वाढ करण्यात आली आहे.
पदासाठी आवश्यक पात्रता -
- उमेदवार हा ज्या गावात जागा रिक्त आहेत त्या पोलिस प्रशासनातील स्थानिक असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा SSC बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा शारीरिक दृष्टीने सदृढ असणे आवश्यक आहे.
- दोन पेक्षा जास्त हयात मुले असू नये .
- उमेदवार हा इतर कोणतीही शासकीय/ निमशासकीय नौकरी करत नसावा .
- उमेदवारचे किमान वय 25 व कमाल वय 45 पेक्षा जास्त असू नये .
निवड पद्धत -
हे पद महाराष्ट्र सरकारने पहिल्या वेळेस वेगळा जीआर काढून पोलीस पाटील पद भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा मार्ग काढला .यामध्ये 80 गुणांची लेखी परीक्षा व 20 गुणांची मुलाखत असे एकूण 100 गुणांची परीक्षा घेतली जाते .आता मुलाखतही बंद करण्यात आली असून केवळ लेखी परीक्षा 100 गुणांच्या आधारे निवड करण्यात येते .
मानधन /वेतन -
पोलिस पाटील यांना अगोदर अत्यल्प स्वरूपात मानधन दिले जात असत .परंतु आता पोलीस पाटील या पदासाठी मासिक रुपये 6000/- एवढे मानधन दिले जाते .
पदोन्नती - हे पद एकाकी असल्याने या पदासाठी कोणत्या प्रकारची पदोन्नती नाही .शिवाय या पदासाठी कोणतेही आरक्षण नाही परंतु महिला आरक्षण लागू आहे .
Comments
Post a Comment