Skip to main content

राज्य शासनाची वाहनचालक मोफत प्रशिक्षण योजना अटी व शर्ते.

 राज्य शासनाची वाहनचालक मोफत प्रशिक्षण योजना अटी व शर्ते.

   महाराष्ट्र शासनातर्फे वाहनचालक प्रशिक्षण योजना राबविण्यात येते यासाठी खाजगी प्रशिक्षण संस्था कडून वाहनचालक प्रशिक्षण घेणाऱ्याना प्रशिक्षण अनुदान दिले जाते.

पात्र लाभार्थी - लाभार्थी विशेष मागासवर्गीय ,विमुक्त जाती/जमाती,इतर मागास प्रवर्ग ,अनुसूचित जाती या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता -10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण अनुदान दर हे प्रशिक्षण वाहन प्रकारानुसार दिले जाते.
हलके वाहन प्रशिक्षण= 4264/-
जड वाहन प्रशिक्षण   = 4960 /-
वाहक                      =1728/-

  जर लाभार्थी प्रशिक्षण काळात वसतिगृह राहत नसल्यास प्रति महा 300 रुपये विद्यावेतन दिले जाते.व वाहक प्रशिक्षण करणाऱ्यास 150 रुपये विद्यावेतन दिले जाते.

  • लागणारे कागदपत्रे 
  • 1)आधारकार्ड /मतदान कार्ड.
  • 2)महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र.
  • 3)10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • 4)शासनमान्य वाहन प्रशिक्षण संस्था प्रवेश पावती.
  • 5)योजना पात्र असणाऱ्या जातीचा दाखला.
अर्ज करण्याची पद्धत -वरील अटी शर्ती पात्र असणाऱ्या उमेदवारांने आपल्या जिल्हा समाजकल्याण कार्यालयस भेट द्यावी .तेथे निशुल्क अर्ज प्राप्त होतो.तो अर्ज भरून द्यावा .

Comments