Skip to main content

"ब्रेक द चेन " या मिशन अंतर्गत काय चालू व काय बंद असेल पाहा सविस्तर.

 "ब्रेक द चेन " या मिशन अंतर्गत काय चालू व काय बंद असेल पाहा सविस्तर.

  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत " ब्रेक द चेन " या मिशनद्वारे काही गोष्टीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये काही गोष्टीवर सूट देण्यात आले आहेत. काय चालू व काय बंद असेल त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहेत.

काय सुरू असेल ?

1)नियमित वाहतूक सुविधा चालू राहील.

  सर्व प्रकारची नियमित वाहतूक सुरू राहतील रिक्षात केवळ दोन प्रवासी प्रवास करू शकतील .टॅक्सीत निश्चित केलेल्या प्रवासी संख्या पेक्षा 50% प्रवासी प्रवास करू शकतील .तर बस मध्ये उभा राहून प्रवास करता येणार नाही प्रवास करताना आपला कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल किंवा कोरोना लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे तसेच रेल्वे मध्ये जनरल डब्ब्यात उभा राहून प्रवास करता येणार नाही.

2)शासकीय कार्यालय 50%कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालू असेल शासकीय कामकाज हे चालू राहील कामकाज दरम्यान शासकीय कर्मचारीची 50% उपस्थिती राहील .कार्यालय प्रमुखांनी बैठका ह्या ऑनलाइन घ्यावेत.


3)शेतीविषयक कामकाज सुरू राहील 
      सर्व शेतीविषयक कामकाज खते ,बियाणे इ.दुकाने चालू राहतील तसेच शेतीविषयक बाजारपेठ चालू राहतील.


4)ई -कॉमर्स सेवा सुरू राहील -
      ई -कॉमर्स पार्सल हे सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत चालू असतील डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचारीचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे अन्यथा 1000 दंड व संबंधित दुकान /संस्थास 10000 रुपये दंड केला जाईल .


5)उद्योग ,उत्पादन /वर्तमानपत्र ,छपाई कामकाज सुरू राहतील .उद्योग, उत्पादन /वर्तमानपत्र ,छपाई कामकाज नियमित सुरू राहतील.

काय बंद राहतील ?

1)वित्तीय कामकाज सोडून इतर खाजगी कार्यालय बंद राहतील वित्तीय कामकाज सोडून इतर खाजगी कार्यालय बंद राहतील.खाजगी कार्यालये वर्क फ्रॉम होम कामकाज सुरू ठेवू शकतील.

2)सलून दुकाने व इतर अनावश्यक दुकाने
   सलून दुकाने व इतर अनावश्यक दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील.


3)प्रार्थनास्थळ /मनोरंजन स्थळे बंद राहतील
     प्रार्थनास्थळ ,धार्मिक स्थळे व मनोरंजन स्थळे बंद राहतील.पुजारीना पूजा अर्चा करता येईल. पण भाविकांना प्रवेस्थावर बंदी असेल.


4)उपहारगृह बंद असतील
     उपहारगृह बंद राहतील पार्सल सेवा चालू राहील .


Comments