सुशिक्षित बेरोजगार साठी उदयोग करण्यासाठी मुद्रा कर्ज योजना .
मा. नरेंद्र मोदी यांनी दि.8 एप्रिल 2015 रोजी बेरोजगार सुशिक्षित युवकांसाठी उद्योग उभारण्यासाठी या कर्ज योजनेची सुरुवात केली.या कर्ज योजनेची तीन गटात वर्गीकरण करण्यात आले आहेत.
1)शिशु गट - 10000/-ते 50000/-
2)किशोर गट -50000/- ते 5 लक्ष
3)तरुण गट - 5 लक्ष ते 10 लक्ष
ही योजना सुशिक्षित बेरोजगार तरुण यासाठी असून किरकोळ भाजीपाला विक्रेता, गवंडी ,लहान उद्योग ,सुतार उद्योग ,बेकरी विक्रेता ,शिंपी हे उद्योग शिशु गटात मोडतात .ह्या योजनेचा लाभ घेणारे तरुण गरीब होतकरु मागासवर्गीय असणे किंवा आर्थिक दृष्टीने मागास असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार कर्जाची रक्कम मिळेल. वरी नमूद केल्याप्रमाणे कर्जाची रक्कम मिळेल.
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम आपण आपल्या जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेला भेट देणे गरजेचे आहे .त्याठिकाणी आपल्याला मुद्रा लोन योजनेचा अर्ज प्राप्त होईल. त्याठिकाणी योजनेची सर्व माहिती प्राप्त होईल .
प्रमुख अटी व शर्ते -
1)लाभार्थी हे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
2)लाभार्थी हे मागासवर्गीय /आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
3)लाभार्थी हे सुशिक्षित असणे आवश्यक आहे.
4)या योजनेची लाभ घेण्यासाठी आपला व्यवसायचा सेटअप असयला हवा.
5)आपल्या व्यवसायाची प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून ते बँक मॅनेजरकडे सादर करावी लागते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळील राष्ट्रीयीकृत बँकेशी संपूर्ण साधावे.
Comments
Post a Comment