राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोलीस भरती बाबत सकारात्मक वक्तव्य.
नुकतेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्यावर लागलेल्या आरोपामुळे यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने आज मा. ना.दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदांचा पदभार स्वीकारला .पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पोलीस भरती बाबत सकारात्मक वक्तव्य केले असून अनेक बाबी त्यांनी स्पष्ट केल्या आहेत.
1)प्रशासनामध्ये हस्तक्षेप करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
2)महत्त्वाचे म्हणजे पोलीस सक्षम करण्यावर भर देणार असे त्यांनी स्पष्ट केले .
3)पोलीस प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागेमुळे पोलीस प्रशासनावर मोठा ताण निर्माण होत आहे .त्यासाठी लवकरच पोलीस भरती करण्याचे आश्वासन दिले आहे.
4)पोलीस वसाहत साठी भरीव काम करणार असे स्पष्ट केले आहे.
5)मा. ना.दिलीप वळसे पाटील हे पोलीस भरती बाबत सकारत्मक धोरण ठरवतील.
Comments
Post a Comment