Skip to main content

वाहतूक सुविधा व इतर कडक निर्बंध लादण्याचे संकेत .

 वाहतूक सुविधा व इतर कडक निर्बंध लादण्याचे संकेत .

  सध्या महाराष्ट्र मध्ये दि .30 एप्रिल 2021 पर्यंत लॉक डाउन असून केवळ काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत .या लॉक डाउन मध्ये जीवनावश्यक गोष्टी तसेच शेतीविषयक कामे इतर काही कामावर कोणतेच निर्बंध लागू नाही .परंतु सध्या नागरिक या लॉक डाउन चे नियम काटेकोरपणे पाळत नसल्याने हे निर्बंध अधिक कडक करण्याचे संकेत देण्यात आले आहेत .जसे की सार्वजनिक वाहतूक सेवा ही अत्यावश्यक सेवा साठी वापर करण्यात यावी असे सांगितले होते परंतु तसे नागरिक करत नसल्याचे दिसून येत आहे .यामुळे महाराष्ट्र शासनाने याबाबत कडक भूमिका घेण्याचे संकेत देण्यात आले आहे .तसेच मुंबई मध्ये लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवांसाठी वापर करावी ,तसेच अत्यावश्यक सेवा देण्याऱ्या कर्मचारी लोकलचा वापर करावा असे निर्देश देण्यात आले होते .परंतु तसे होत नसल्याचे दिसून येत आहे .यामध्ये नागरिक सारखे गर्दी होत असल्याचे दिसून येत असल्याने याबाबत कडक भूमिका घेऊ असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे .त्याचबरोबर अत्यावश्यक दुकाने ,फळे हे सुध्दा बंद करण्याचे संकेत दिले आहे .त्यामुळे नागरिक लॉक डाउनचे निर्बंध काटेकोरपणे पाळावे अन्यथा कडक पवित्रा घेऊ असे सांगितले आहे .
    तसेच सार्वजनिक वाहतूक बंद होण्याचे संकेत समोर येत आहेत .त्यामुळे ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांनी लसीकरण करून घ्यावी लागेल .अन्यथा प्रवास करता येणार नाही .

Comments