Skip to main content

महिला बचत गट योजना व फायदे.

              महिला बचत गट योजना व फायदे.

     

      महिला बचत गटास स्वयंसहाय्यता असेही म्हणतात .यामध्ये केवळ महिला सदस्य एकत्र येतात व गट स्थापन करतात .याचा मुख्य उद्देश म्हणजे एकमेकांना आर्थिक सहाय्यपूर्ण करणे हा असतो. यामध्ये 20 व त्यापेक्षा कमी महिला एकत्र येतात व काही विशिष्ट रक्कम जमा महिन्यातून एकदा किंवा आढवड्यातून एकदा जमा करतात .व जमा झालेली रक्कम ही गटामधीलच सदस्यांनी विशिष्ट व्याजदराने कर्जाने रक्कम दिली जाते.

महिला बचत गटाचे वैशिष्ट्ये -

1) यामध्ये केवळ महिला सदस्याचे गट असते.

2)18 वयोवर्ष पूर्ण झालेल्या कोणतीही महिला सदस्य या गटाचे सदस्य होऊ शकतात.

3)महिला बचत गटाचा मुख्य उद्देश हा आर्थिक सहाय्य करणे हा असतो.

4)महिन्यातुन किंवा आढवड्यातून एकदा बचत गटातील सदस्य एकत्र जमा होऊन विशिष्ट रक्कम जमा करतात.

5)जमा झालेली रक्कम ज्या सदस्याला आवश्यक आहे ,त्यांना विशिष्ट व्याजदराने दिली जाते.


बचत गटाचे शासकीय व वित्तीय फायदे -

1) विविध बँकेमार्फत महिला बचत गटांना अत्यल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देतात.

2)शासनाच्या विविध योजना जसे लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केले जाते. व या व्याजाचा दर केवळ 2%असतो .व परतफेडीची मदतही 5 वर्षाची असते.

3)तसेच ग्रामीण भागातील महिला बचत गटांना ग्रामीण व्यवसाय ,म्हैस, शेळ्या स्वरूपात मदत केली जाते .


महिला बचत गट कसे सुरू कराल ?

      20 व त्यापेक्षा कमी महिला एकत्र आल्यानंतर त्यांचे आधारकार्ड/ओळखीचा पुरावा ,रेशनकार्ड, पॅन कार्ड सोबत आपल्या नजीकच्या राष्ट्रीयीकृत बँकेला भेट देऊन बचत गटाच्या नावाने खाते उघडावे.शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत बचत गटाच्या नावाने खाते असणे आवश्यक आहे.


आदर्श बचत गटाचे उदाहरण -

  पुण्यातील एका महिला बचत गटाने लिज्जत पापड सारखा प्रसिद्ध पापड पदार्थ तयार करून महिना लाखो रुपयांची उलाढाल करतात .



x

Comments