आज रात्रीपासून जिल्हाबंदी वआंतरराज्य बंदी ,प्रवासासाठी लागेल पास.
सध्या कोरोनामुळे मृत्यू प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असून ,शिवाय रुग्णांना बेडच उपलब्ध होत नाहीत त्यामुळे कोरोना रुग्ण दगावण्याची संख्या वाढत आहे .त्यामुळे हा कोरोनाचा पादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत .तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत ,त्यामुळेच राज्यात आज रात्री 8 पासून राज्यात जिल्हाबंदी करण्यात आली आहे .तसेच आंतरराज्य बंदी करण्यात आली आहे .यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आता पासची आवश्यक लागणार आहे तेही अत्यावश्यक काम असल्यासच प्रवास करता येणार आहे .यामध्ये केवळ अत्यावश्यक कामकाज जसे रुग्णांना व त्यासोबत एका नातेवाईकास तसेच सरकारी कर्मचारी यांनाच प्रवास करता येईल पास आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मिळेल किंवा ऑनलाइन पोलीस संकेतस्थळावरून अर्ज करून मिळवता येईल .
खाजगी बसेस मध्ये प्रवास करताना केवळ 50% प्रवाशांना प्रवास करता येईल तेही अत्यावश्यक कामकाज असल्यास प्रवास करता येईल.
Comments
Post a Comment