लॉक डाउनचे नवे नियम व निर्बंध/काय चालू व काय बंद असेल.
आज दिनांक 13 एप्रिल 2021 रोजी मा .ना.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून बोलताना त्यांनी काही निर्बंध घातले आहेत .निर्बंध पुढीलप्रमाणे आहे .
1) उद्या दि 14 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे .म्हणजे उद्यापासून राज्यात संचारबंदी लागू होणार आहे .
2)अनावश्यक रस्त्यावर फिरणे बंद होईल .
3)अत्यावश्यक आस्थापना वगळून इतर सर्व आस्थापना बंद असतील .
4)हॉटेल, बार ,रेस्टॉरंट बंद असतील .
5)खाजगी कोचिंग बंद असतील .
काय चालू राहील -
1) सार्वजनिक वाहतूक सेवा, मेट्रो ,बस विमान वाहतूक चालू राहतील .
2)मेडिकल, किराणा दुकान अत्यावश्यक सुविधा चालू असतील.
3)उद्योग ,वाणिज्य शाखा चालू राहतील .
गरिबांना मिळणारे लाभ -
1) आदिवासी बांधवाना खावटी योजनेअंतर्गत 2000 /- मिळणार.
2)संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना अगोदरच 1000 /- रुपये मिळतील.
3)रिक्षाचालक यांना 1500/- रुपये मिळणार.
4)नोंदणीकृत बांधकाम कर्मचारी, फेरीवाले यांना 1000/- मिळतील.
Comments
Post a Comment