Skip to main content

लॉकडाउन मध्ये घरीच राहून कमावण्याच्या संधी .

 लॉकडाउन मध्ये घरीच राहून कमावण्याच्या संधी स्रोत .


     महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहेत.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अनेक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे अनेकजनाना जॉब वरून कमी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे घरीच राहून कमाई करण्याचे संधी शोधली पाहिजे .व ही संधी कायमस्वरूपी कमाई करून देणारी आहेत त्या संधी स्रोत खालीलप्रमाणे सांगता येतील.

1)आपला स्वतःचा व्यवसाय असल्यास ,त्याची ऑनलाइन पद्धतीने विक्री करणे .
        अमेझॉन ,फ्लिपकार्ट ,खाद्य पदार्थांसाठी झोमॅटो सारखे ऑनलाइन apps आहेत .या apps च्या माध्यमातून आपण आपल्या वस्तू /पदार्थ ऑनलाइन पद्धतीने विक्री करू शकतो. व या माध्यमातून चांगली कमाई करू शकतो ,ज्यांचा अगोदर व्यवसाय होता असे व नव्यानेही सुरू करु शकतात.

2)ऑनलाइन माध्यम - युट्युब
         ऑनलाइन माध्यम युट्युब सध्या खूप लोकप्रिय झालेला आहे. या माध्यमातून अनेक जण ऑनलाइन पैसे कमावतात .यामध्ये आपला युट्युब चॅनेल तयार करून आपल्या कडील असणाऱ्या कला ,कौशल्य यांच्यावर आधारित विडिओ तयार करून युट्युब वर अपलोड करून पैसे कमाई करू शकतो.

3) टेलिकॉम सेवांमध्ये - कस्टमर केअर 
    टेलिकॉम सेवांमध्ये कस्टमर केअर हा जॉब घरी बसून करू शकता  .यासाठी आपल्याकडे आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे व केवळ मुलाखत घेतली जाते .आपल्याकडे लॅपटॉप किंवा pc असणे आवश्यक आहे. व स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.

4)ब्लॉगिंग -
   आजच्या काळामध्ये ब्लॉगिंग करून अनेक जण भरपूर पैसे कमवत आहेत. यामध्ये केवळ आपल्या कडे असणारी कला, कौशल्य याचा वापर करून लेख आपल्या ब्लॉगिंग साईट वर प्रकाशित करून पैसे कमावू शकतो.

5) ऑनलाइन जॉब - डाटा एन्ट्री, वेबसाईट डिझाइन
      ऑनलाइन पद्धतीने काम करून कमाई करू शकतो. ऑनलाइन कामकाज करून अनेक साईड ह्या फ्रॉउड करतात .अमेरिकेची guru.com या वेबसाईटवर वर कामकाज करून रिअल कमाई करू शकतो.
     


Comments