Skip to main content

असंघटित कर्मचारी /कामगार /शेतकरी साठी अत्यल्प प्रीमियम वरील अटल पेन्शन योजना.

 असंघटित कर्मचारी /कामगार /शेतकरी साठी अत्यल्प प्रीमियम वरील अटल पेन्शन योजना.


योजनेचे नाव - अटल पेन्शन योजना .
ही योजना केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येते .
प्रमुख अटी व शर्ते -
1) लाभार्थी हा भारताचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
2)वयाचे कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 40 वर्ष असणे आवश्यक आहे.
3)लाभार्थी हा असंघटित कर्मचारी ,खाजगी कर्मचारी, शेतकरी, रोजगार करणारे मजूर या योजनेसाठी पात्र ठरतील .


या योजनेचे फायदे - 
1)अत्यल्प प्रीमियम ची सुविधा .
2)यामध्ये केंद्र सरकार 50 % रक्कम लगेच प्रिमियम मध्ये जमा करते .
3)प्रीमियम महिन्याला ,तिमाही ,अर्धवर्षी प्रीमियम भरता येतो.
4)वयाच्या 60 व्या वर्षीपासून लगेच पेन्शन चालू होईल .
5)ज्यांना एकदाच भरलेली रक्कम हवी असेल त्यांना व्याजासकट केंद्र सरकारतर्फे जमा झालेली 50 %रक्कम वयाच्या 60 व्या वर्षी मिळेल.


आवश्यक कागतपत्रे -
1)आधारकार्ड /मतदानकार्ड
2)रहिवासी पुरावा
3)कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

या योजनेचे प्रिमियम केवळ 126 ते 864 रुपयांपर्यंत आहे .वयाच्या 60 व्या वर्षी किमान आपल्या प्रिमियम नुसार 1000 ते 5000 रुपये मासिक पेन्शन मिळेल .


योजनेचा लाभ कसा घ्यावा -
ज्या राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे त्या बँकेत अटल पेन्शन योजनेचा अर्ज मिळेल. त्या ठिकाणी अर्ज भरून आपल्या वयानुसार प्रिमियम ची चौकशी करावी .वय कमी प्रिमियम कमी वय जास्त असल्यास प्रिमियम जास्त लागेल.


Comments