किरकोळ प्रोफेशनल व्यवसाय करून कमवा लाखो रुपये .
किरकोळ प्रोफेशनल व्यवसाय म्हणजे कामात सुसूत्रता असणे होय .जे काम आपण चांगल्या पद्धतीने करून कमी हार्ड /शारीरिक काम पण बौद्धिक काम करून चांगला प्रोफेशनल व्यवसाय करू शकता .
ग्रामीण व शहरी भागातही व्यवसाय करू शकता .यामध्ये प्रोफेशनल रित्या कोणते व्यवसाय करता येतील ते खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतील.
1) मोबाईल दुरुस्ती व अवलंबून कामे -
मोबाईल दुरुस्ती करणे हा एक प्रोफेशनल व्यवसाय असून हा व्यवसाय निरंतर चालणारा व्यवसाय आहे.या व्यवसायामध्ये चांगली कमाई करू शकतो .यामध्ये ITI मध्ये मोबाईल रेपेरिंग करण्याचा कोर्स असतो .हा कोर्स केल्यानंतर चांगल्या पध्दतीने हा व्यवसाय करू शकतो.
2)बेकरी व्यवसाय -
हा एक चांगला व्यवसाय आहे .यामध्ये 50 % मार्जिन भेटते .यामध्ये काही विशिष्ट लोकांचा समुदायच हा व्यवसाय करतात .यामध्ये महाराष्ट्रीयन लोक कमी आहेत .त्यामुळे आपणही हा व्यवसाय करू शकतो .बेकरी पध्दत सहज सोपी असते एकदा शिकून घेतल्यानंतर सहज समजून जातो व चांगला नफा कमावू शकतो.
3)हेअर सलून व्यवसाय -
महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात हा व्यवसाय चांगला चालतो. व त्यांची ही कला त्यांचा कमाई करण्याचा स्रोत आहे .परंतु आजकाल ही कला आत्मसात करून हा व्यवसाय करू लागले आहेत .ITI मध्ये हेअर कटिंग हा 6 महिने ते 1 वर्ष कालावधीचा कोर्स असतो .हे कोर्से केल्यानंतर स्वतः चा चांगला व्यवसाय सुरू करू शकतो. व चांगली कमाई करू शकतो.
4) ब्यूटी पार्लर -
हा व्यवसाय आजकाल ग्रामिण भागमध्येही चांगला चालत आहे .हा व्यवसाय जास्त करून महिला करतात .ब्यूटी पार्लरचा कोर्स करून चांगला व्यवसाय करून चांगली कमाई करू शकतो .व हा व्यवसाय निरंतर चालणार व्यवसाय आहे.शहरी भागामध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो .
5)जिम व्यवसाय -
हा व्यवसाय शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात चालतो .आजकाल ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय चालत आहे. पण याची गुंतवणूक जास्त आहे.1 ते 3 लाख प्रथम गुंतवणूक करावी लागते .व हा व्यवसाय निरंतर चालणारा व्यवसाय आहे.
6)ग्राहक सेवा केंद्र -
ही एक बँकिंग सुविधा असून यामध्ये पैसे काढणे ,पैसे भरणा करणे .बँकिंग व्यवहार केले जाते .यासाठी बँकिंग ID बँकेमार्फत जनरेटर करून घ्यावी लागते .यामध्ये चांगला कमिशन मिळते .हा व्यवसाय ग्रामीण व शहरी भागातही चालतो .
7)LIC ऐजेंट / पॉलिसी ऐजेंट -
LIC ऐजेंट व इतर प्रकारचे पॉलिसी विक्री करून चांगली कमाई करू शकतो .कमिशन स्वरूपात कमाई होते .जास्त पॉलिसी काढल्यानंतर जास्त कमिशन मिळेल .
Comments
Post a Comment