Skip to main content

फेक/बनावट फेसबुक खाते शोधून ते कसे बंद करावे ?

 फेक/ बनावट फेसबुक खाते शोधून ते कसे बंद करावे ?

  आजकाल मोठ्या प्रमाणात बनावट फेसबुक खाते तयार करून अनेकांची फसवणूक केली जात आहे .अनेकांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते चालू करून त्यांच्या मित्राला FRIEND REQUEST पाठवून त्यांच्याकडून पैशाची मागणी करून फसवणूक केली जात आहे .तसेच बनावट खाते चालू करून मोठ्या प्रमाणात सध्या फसवणूक केली जात आहे .हे बनावट खाते शोधून ते बंद कसे करावे ते खालीलप्रमाणे आपण आपल्या नावाचे बनावट खाते शोधून ते बंद करू शकतात .


  •  सर्वप्रथम आपल्या  नावाच्या फेक फेसबुक खाते शोधावे ,जर आपल्याला शोधता येत नसेल तर मित्रांना शोधण्यासाठी सांगावे व फेक प्रोफाइलची URL मागून घ्यावे .तसेच ज्यांना या फेक प्रोफाइल वरून FRIEND REQUEST  गेली आहे त्यांच्याकडून त्या प्रोफाइलची URL  घ्यावी .
  • त्यानंतर अशा फेक प्रोफाइल वर जाऊन त्या प्रोफाइलच्या उजव्या बाजूला 3 डॉट दिसतील त्यावर CLICK करा.
  • त्यानंतर तुम्हाला FIND SUPPORT OR REPORT PROFILE या ऑप्शनवर CLICK करा .
  • त्यानंतर Pretending To Be Someone या ऑप्शनवर Click करावे .
  • त्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील 1)me,2)a friend 3) celebrity यांपैकी आपण स्वतः ची फेक प्रोफाइल बंद करावयाची असल्याने यापैकी me या option वर क्लिक करावे .
  • Me या ऑप्शन वर क्लिक करून Next या ऑप्शन वर क्लिक करावे काही वेळानंतर आपली फेक बनावट फेसबुक खाते बंद होईल .

Comments