Skip to main content

Lockdown आणखीन 15 दिवसांसाठी वाढणार.

 Lockdown आणखीन 15 दिवसांसाठी वाढणार.


    महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होत आहेत परंतु कोरोणाची लसीकरण हव्या तेवढ्या प्रमाणात झालेले नसल्याने lockdown उठविल्यानंतर परत रुग्ण संख्या वाढण्याची भीती आहेच .सध्या लसीकरण केवळ 45 वर्ष वयापेक्षा जास्त असणाऱ्या नागरिकांनाच लसीकरण केले जात आहेत .तरीसुद्धा ग्रामीण भागात लस घेण्यास नागरिक अद्याप तयार नाहीत .अनेकांना लसीचा दुसरा डोस लसीच्या तुटवड्या मुळे मिळत नाही. त्यामुळे लगेच lockdown उठविणे शक्य नाही .


  याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, lockdown अजून 15 दिवसांनी पुढे वाढवावे लागणार आहेत .त्याबाबत काही गोष्टीवर सूट देण्यासाठी मंत्रालयीन बैठक होऊल त्यामध्ये नवीन नियमावली जाहीर होईल .परंतू ज्या जिल्ह्याची positivity रेट जास्त असेल त्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे .याबाबत नवीन नियमावली 1 जूनला जाहीर केली जाईल असे सांगितले .

    ज्या जिल्ह्यामध्ये रुग्ण संख्या जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये या नवीन नियमावली नुसार कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नसून त्या ठिकाणी lockdown कायदा राहील. याबाबत सविस्तर नियमावली जाहीर केली जाईल .

Comments