Skip to main content
अग्निशमन दल भरती ,वेतन व अग्निशमन कोर्स माहिती व मिळणाऱ्या नौकारीचे संधी .
अग्निशमन दल भरती ,वेतन व अग्निशमन कोर्स माहिती व मिळणाऱ्या नौकारीचे संधी .
सध्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये मोठया प्रमाणात रिक्त जागा आहेत .त्यात अग्निशमन विभागामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत .अग्निशमन दल हे प्रत्येक महानगरपालिका ,नगरपरिषद, व जिल्हा परिषद विभागामध्ये कार्यरत असते .परंतु सध्या या दलामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे झाली आहेत .या पदांसाठी लागणारी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे सांगता येईल .
या दलामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे पद असतात .
1)अग्निशमन दल जवान
2)अग्निशमन दल मदतनीस
शैक्षणिक पात्रता -
1)अग्निशमन दल जवान - 12 उत्तीर्ण.
2)अग्निशमन दल मदतनीस - 10 वी उत्तीर्ण
वरील दोन्ही पदांसाठी अग्निशमन कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
भरतीसाठी आवश्यक असणारी शाररिक पात्रता -
उंची 170 सें. मी असणे आवश्यक आहे.
वेतन - शासकीय अग्निशमन दल जवान यांना राज्य सरकारच्या वेतन पे बँड - 5200-20200 या पे -स्केल नुसार वेतन मिळते .व इतर काही भत्ते सुध्दा मिळतात .
अग्निशमन कोर्स माहिती -
हा कोर्स खाजगी संस्थेमध्ये उपलब्ध असते परंतु ते शासनमान्य संस्था असणे आवश्यक आहे. हा कोर्स कमीत कमी 3 महिने व जास्तीत जास्त 1 वर्ष कालावधी चा असतो .शासकीय नौकारीसाठी 6 महिनेचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अग्निशमन कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या संधी -
हा कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर शासकीय व खाजगी स्वरूपाच्या नौकारीच्या संधी मिळतात .प्रत्येक खाजगी कंपनी मध्ये अग्निशमन दल विभाग असतोच,शासकीय नौकारीसाठी मोठया प्रमाणात संधी उपलब्ध असतात .
Sir I am interested pls help mi ads fire course
ReplyDelete