महाराष्ट्र राज्य पोलिस भरती 2021 बाबत मोठी अपडेट .
महाराष्ट्र पोलिस भरती 2021 बाबत मोठी अपडेट आलेले असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 12500 पोलीस शिपाई पदासाठी भरती करण्याचा निर्णय घेतला असून डिसेंबर 2021 पर्यंत 5200 पोलिस शिपाई पद भरती केली जाणार असून उर्वरित 7300 पदे ही टप्याटप्याने भरण्यात येणार आहेत .
शिवाय ही पद भरती 2019 मध्ये फॉर्म भरलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार असून नव्याने उमेदवारांना फॉर्म सुद्धा भरता येणार आहेत .
याबाबत पोलीस यंत्रणा कडून पूर्वतयारी करण्यात येत आहेत .लेखी व शारीरिक चाचणी बाबत चाचपणी करण्यात येत आहेत .2019 मध्ये महाराष्ट्र पोलीस मध्ये 5200 पदांसाठी भरती बाबत जाहिरात अली होती परंतु कोविड 19 मुळे ही भरती रद्द करण्यात आली होती .परंतु आता ही भरती केली जाणार आहे .
तसेच लेखी परीक्षा साठी आसन व्यवस्थासाठी शाळा महाविद्यालयाची चाचपणी केली जात आहे .
Comments
Post a Comment