कायम ,कंत्राटी व रोजंदारी भरती मधील फरक .
सरकारी नौकारी मध्ये कायम ,कंत्राटी व रोजंदारी पद्धतीने पद भरती केली जाते .यामध्ये नेमका फरक कोणते आहेत ते खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतील .

कायमस्वरूपी पद भरती -
- हे पद स्थायी स्वरूपाचे पद असून हे पद कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून गणले जाते .
- या पदांसाठी वेतन व इतर भत्ते मिळतात .
- या पदांवर जोखमीची जबाबदारी असते .
- हे पद प्रत्यक्ष सरकारला जबाबदार असतात .
- इतर कंत्राटी व रोजंदारी कर्मचारी पेक्षा जास्त अधिकार या कायमस्वरूपी पदांना असतो .
कंत्राटी व रोजंदारी पद भरती -
- ही पद भरती कायमस्वरूपी नसून तात्पुरत्या स्वरूपाची असते .
- कंत्राटी पद भरती मंजूर पद रिक्त असल्यास तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने पद भरले जातात हे पद कमीत कमी 3 महिने व जास्तीत जास्त 3 वर्ष पर्यंत कालावधी साठी पद भरले जातात .
- रोजंदारी हे पद आवश्यकता नुसार रोजगार पद्धतीने भरले जातात .ज्यावेळी आवश्यकता नसेल त्या वेळी हे पद बरखास्त केले जातात .
- या पदांसाठी मिळणारे वेतन कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठोक मासिक मानधन मिळते .
- रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामाच्या दिवासानुसार मानधन मिळते .
- या दोन्ही प्रकारच्या पदांना कोणत्याही प्रकारचे भत्ते मिळत नाहीत .
- या पदांना कोणत्याही प्रकारचे जोखमीचे/ जबाबदारी चे काम या पदावर सोपवले जात नाहीत .
Comments
Post a Comment