Skip to main content

महाराष्ट्र पोलीस भरती सप्टेंबर च्या दुसऱ्या आढवड्यात होणार .

 महाराष्ट्र पोलीस भरती सप्टेंबर च्या दुसऱ्या आढवड्यात होणार .

   महाराष्ट्र राज्याच्या गृह मंत्रालय मध्ये पोलीस शिपाई पदासाठी गेल्या दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया झाली नसून येत्या सप्टेंबर 2021 च्या दुसऱ्या आढवड्यात ही महाभरती होणार आहे .त्यासाठी SEBC विद्यार्थ्यांना विकल्प निवडीसाठी 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे .


  सन 2018 च्या एकूण सहा हजार रिक्त पदे असून 2019 ते 2021 पर्यंत जवळपास 15 हजार सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांमुळे रिक्त पदे निर्माण होणार असून वाढत्या लोकसंख्या वाढीच्या प्रमाणानुसार वाढीव पदे महाराष्ट्र पोलीस खात्यात सन 2016 नंतर भरण्यात आलेली नाहीत .त्यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होत आहेत .


    पोलिसांची पदे ही लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदे भरली जातात .जर लोकसंख्या वाढली तर वाढीव पदे व वाढीव पोलीस ठाणे वाढवणे आवश्यक असते .परंतु 2016 नंतर या प्रमाणानुसार भरती करण्यात आलेली नाहीत .


  या प्रमाणानुसार भरती केल्यास महाराष्ट्र पोलीस शिपाई पदासाठी सुमारे 22 हजार पदे भरणे आवश्यक आहे .जेणेकरून पोलीस यंत्रणेवर ताण निर्माण होणार नाही .


 येत्या सप्टेंबर 2021 च्या दुसऱ्या आढवड्यात महाभरती होणार असून त्यासाठी 14 हजार पदावर भरती प्रक्रिया केली जाणार आहे .



Comments