Skip to main content

अफगाण सैन्याच्या अपयशाची कारणे ?

 अफगाण सैन्याच्या अपयशाची कारणे ? 

     अफगाणिस्तान मध्ये केवळ 8 ते 15 दिवसांमध्येच सत्ता पालट कशी झाली या मागचे बरेचशे कारणे आहेत .अफगाण सैन्य तालिबाणीचा सामना का करू शकला नाही ,या मागचे रहस्यच नेमका जगाला समजले नाही .

      अफगाण सैन्य 3 लाख एवढी संख्या तर 26 हजार स्पेशल कमांडो होते .त्या विरोधात तालिबानी केवळ 76 हजार होते .या आकड्यावरून तालिबाण्याचा टिकाव अफगाण सैन्यासमोर लागणार नाही असे दिसून येते .अफगाण सैन्य लढाई न करताच अपयशी का झालं यामागचे काही कारण आहेत ते खालीलप्रमाणे आहेत .
  • अफगाणिस्तान हा एक गरीब देश असून या देशाचा आर्थिक कारभार हा विविध देशामधून आलेल्या मदतीवर अवलंबून होता .
  • अफगाणिस्तान देशाची अंतर्गत तालिबानी पासून संरक्षनाची जबाबदारी ही अमेरिकेनी घेतली होती परंतु अमेरिकेचा त्यावर खूप खर्च व्हायचा त्यामुळे अमेरिकेने सैन्य परत बोलावले .त्यामुळे तालिबानी अधिक सक्षम झाले .
  • अमेरिकेने आपले सैन्य परत बोलवण्याच्या अगोदरच तेथे सैन्य दलामध्ये भरती केली होती .परंतु त्यांना चांगले प्रशिक्षण देऊ शकले नाही कारण अमेरिकेचे सैन्य लवकर परत अमेरिकेत गेली 
  • अफगाण सैन्याचा पगार वेळेवर न होणे पगारमधील अनियमितपणा यामुळे सैन्यात सरकार विषयी असंतोष निर्माण झाला होता .
  • अफगाण सैन्य नागरिकांची तुटमार किंवा योग्य सरंक्षण न देणे  या कारणामुळे नागरिकांचा सैन्यावरचा विश्वास उडाला होता .
  • याउलट तालिबानी यांनी अफगाणिस्तान मध्ये रस्ते ,बांधणे तसेच सामाजिक काम करून अफगाण नागरिकांच्या मनात चांगली प्रतिमा बनवली होती त्यामुळे खाक भागात त्यांना पाठिंबा मिळाला .
  • शिवाय अफगाणिस्तान मधील 5 हजार तालिबानी कैद्यांची सुटका केल्यामुळे तालिबाणीना अधिक जोर मिळाला .

Comments