Skip to main content
शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 % पर्यंत वाढणार .
शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 % पर्यंत वाढणार .
मुंबई - महाराष्ट्र राज्य सरकारने अद्याप पर्यंत जरी महागाई भत्ता मध्ये वाढ केलेली नाही. परंतु राज्य सरकार 1 जुलै 2021 पासूनच महागाई भत्ता लागू करणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असून जानेवारी 2022 मध्ये हा महागाई भत्ता 31% पर्यंत वाढ होईल.
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 28% प्रमाणे महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून लागू केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर बिहार , कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश इत्यादी राज्य सरकारने आपल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ केली. परंतु महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अद्याप महागाई भत्ता मध्ये वाढ करण्यात आलेली नाही.
28% दराने महागाई भत्ता बाबत निर्णय ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीच्या सणाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 28% पर्यंत वाढ करून दिवाळीचे गिफ्ट देण्यात येणार आहे.
महागाई भत्ता वाढ जुलै 2021 पासून अपेक्षित होती परंतु माहे जुलै ते सप्टेंबर या महिन्यामध्ये 7 वा वेतन आयोगाच्या फरकाचा दुसरा हफ्ता देयक देऊ केल्याने महाराष्ट सरकारने महागाई भत्ता बाकीचा निर्णय थांबवला आहे.
माहे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात महागाई भत्ता 28% बाबतचा निर्णय घेवून लागू करण्यात येईल. परंतु 1 जुलै 2021 पासूनचा महागाई भत्ता फरक देयक बाबत नंतर नव्याने शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल.
Comments
Post a Comment