Skip to main content

राज्य शासकीय कर्मचारी महागाई भत्ता व पगारामध्ये होणार मोठी वाढ .

 राज्य शासकीय कर्मचारी महागाई भत्ता व पगारामध्ये होणार मोठी वाढ .

   केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 28 टक्के दराने व दिवाळीमध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. परंतु महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत महागाई भत्ता मध्ये वाढ करण्यात आली नाही .परंतु राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आली आहे.



   यामध्ये राज्यशास्त्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 11 टक्क्याने वाढणार आहे. व वेतन त्रुटी मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. केंद्रीय कर्मचारी प्रमाणे आता महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे याबाबत दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी माननीय मुख्य सचिव सोबत मीटिंग पार पडली आहे.


   या मिटींगचे काही ठळक मुद्दे
  • माननीय बक्षी समितीच्या वेतन त्रुटी मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
  • दिनांक 01 जुलै 2021 पासून महागाई भत्ता 11 टक्क्याने वाढ करण्यात येणार आहे.
  • राज्यातील 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर नवीन पेन्शन योजनेतील सुविधा लागू करण्यात येणार आहे.
  • सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना साठ वय वर्ष करण्यात येणार आहे.
  • शासकीय सेवेत कार्यरत पती-पत्नी एकत्रित ठेवण्याच्या धोरणांमध्ये सोईनुसार बदल करण्यात येणार आहे .
  • महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यरत ठिकाणी मध्ये चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Comments