Skip to main content
राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ झाल्याने माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधी मधील कोणकोणते फरक मिळणार ?
राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ झाल्याने माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधी मधील कोणकोणते फरक मिळणार ?
महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 1 जुलै 2021 पासून 28 % दराने लागू करण्यात आला आहे .हा महागाई भत्ता ऑक्टोबर च्या वेतन देयकसोबत रोखीने लागू करण्यात येणार आहे .परंतु माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या तीन महिन्यांच्या कालावधी मधील फरक देण्यासाठी नव्याने आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत .
या तीन महिन्यांच्या काळावधीमधील कोणकोणते फरक मिळणार आहेत ,ते पाहूया .
1) महागाई भत्ता वाढल्याने महागाई भत्ता 11 % वाढीव महागाई भत्ता फरक मिळणार आहे .
2) दि .05/02/2021 रोजीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता 25 % पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्ता मध्ये वाढ नियोजित आहे .ही वाढ अनुक्रमे शहराच्या वर्गवारीनुसार 27%,18%,9% अशी वाढ झाल्याने हा फरक मिळणार आहे .
3)त्याचबरोबर महागाई भत्ता वाढल्याने ज्या कर्मचाऱ्यांना NPS योजना लागू आहे .अशा कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये NPS /DCPS फरक कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे .
4)तसेच महागाई भत्ताशी संलग्न असणारे भत्ते मध्ये सुद्धा वाढ झाल्याने त्यांचा वाढीव फरक सुध्दा मिळणार आहे .
कॉन्ट्रॅक्ट बेस व आऊटसोर्सिंग कर्मचारी यांच काय???????
ReplyDelete