Skip to main content
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबरचे वेतन देयक वेळेत अदा होणार .
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबरचे वेतन देयक वेळेत अदा होणार .
माहे ऑक्टोबर या महिन्याचे वेतन वेळेत देयक अदा करण्यासाठी शासनाने सर्व विभागांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सण असल्याने सर्व विभागामधील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे तसेच निवृत्तीवेतन धारकांचे व कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांचे वेतन देयक वेळेत अदा करण्याबाबत सर्व शासकीय विभागांना सूचना देण्यात आले आहेत.
ऑक्टोबरच्या वेतन देयकसोबत वाढीव 28% प्रमाणे महागाई भत्ता व माहे जुलै 2019 ते माहे नोव्हेंबर 2019 या पाच महिन्याचे वाढीव 5% दराचे महागाई भत्ता फरक देयक त्याचबरोबर नोव्हेंबर मध्ये दिवाळी सण असल्याने कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रीम देयके अदा करण्यात येणार असल्याने वाढीव अनुदाने सर्व विभागांना वितरित करण्यात आले आहेत .
त्याचबरोबर दिवाळी सण अग्रीम CMP प्रणाली द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे .
Comments
Post a Comment