Skip to main content
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित वाढीव घरभाडे भत्ता मंजुरीबाबत शासन निर्णय .
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित वाढीव घरभाडे भत्ता मंजुरीबाबत शासन निर्णय .
राज्य शासनाने दि.05/02/2019 रोजी शासन निर्णय काढून बक्षी समिती खंड - 1 मधील घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करून सुधारित घरभाडे भत्ता बाबतचा शासन निर्णय लागू केला आहे .
राज्य शासनाने दि .01 जुलै 2021 पासून महागाई भत्ता 28 % दर प्रमाणे लागू केल्याने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ झाली आहे .यामध्ये प्रामुख्याने घरभाडे भत्ता मध्ये वाढ झाली आहे.
वित्त विभागाचा दि .05/02/2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता 25 % पेक्षा अधिक झाल्यास त्याचबरोबर महागाई भत्ता 50 % पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्ता मध्ये वाढ नियोजित आहे .
सध्याचा घरभाडे भत्ता
शहरांची / गावांची घरभाडे भत्ता
वर्गवारी
X 24%
Y 16%
Z 08%
महागाई भत्ता मध्ये 25 % पेक्षा अधिक वाढ झाल्याने घरभाडे भत्ता मधील वाढ खालीलप्रमाणे आहे .
शहरांची / गावांची घरभाडे भत्ता
वर्गवारी
X 27%
Y 18%
Z 09%
दि 01जुलै 2021 पासून वरील प्रमाणे घरभाडे भत्ता लागू राहील.
याबाबतचा सविस्तर शासन निर्णय खालील लिंक वरून शासन निर्णय डाउनलोड करा.
Comments
Post a Comment