Skip to main content

चीनने सादर केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार.

 चीनने सादर केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार.

    चिनी प्रसिद्ध कार निर्माता वुलिंग यांनी जगामधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार सादर केली आहे .ही कार इलेक्ट्रिक असल्याने या कारची मागणी सर्वात जास्त असणार असून भारतामध्ये या कारची लोकप्रियता मोठी वाढणार आहे .कारण भारतामध्ये इंधनाचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने या कारची किंमत वाढणार आहे .पेट्रोल, डिझेल ला पर्याय म्हणून भारतीय लोक या कारला जास्त पसंदी देतील .



या कारची प्रमुख वैशिष्ट्ये .
  • कारचा आकार लहान .
  • ही कार मारुती अल्टो पेक्षा आकाराने लहान आहे .
  • या कारची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे या कारमध्ये दोनच सीट आहेत .
  • या कारचे नाव -  " वुलिंग नॅनो " असे आहे .
  • या कारची मोटर 33 BHP पॉवर आहे .
  • या कारची कमाल वेग प्रतितास 100 km आहे .
  • या कारची बॅटरी 28 kwh ip67 आहे .
  • कारची लांबी - 2497 mm
  • कारची रुंदी - 1526 mm
  • कारची उंची - 1616 mm
या कारची किंमत - 
    ही कार अत्यंत स्वस्त असल्याने भारतीय मध्यम वर्गीय लोकांना परवडणारी कार आहे .या कारची किंमत 2.5 लाखापेक्षा जास्त असणार नाही असे चिनी कार उत्पादक मालकाने सांगितले आहे .




    या कारला घरगुती वीज जोडणी वर पूर्ण चार्जिंग करण्यासाठी 13.5 ते कमाल 14 तास लागतात .तर, 6.6 k.wt Ac वीज जोडणी वर पूर्ण वेळ चार्जिंग करण्यासाठी 4 तास लागतात .


   चीनने यापूर्वी सुध्दा अश्या कारची निर्मिती केली होती व या 2020 मध्ये कारची 119,255 युनिट विक्री झाले होते.इलेक्ट्रिक कारच्या स्पर्धेमध्ये भारतीय कार उत्पादक इलेक्ट्रिक कार निर्मिती साठी पुढाकार घेत असून मारुती कार उत्पादक कंपनीने आपली इलेक्ट्रिक कारची सादर केली आहे .परंतु मारुतीने सादर केलेली कार ही चीनच्या कार पेक्षा आकाराने मोठी आहे .
   
    एकेकाळी TATA नॅनो ही कार जगामध्ये सर्वात लहान कार म्हणून लोकप्रिय कार होती .या कारला विदेशामधून सर्वात जास्त मागणी होती .परंतु काही तांत्रिक बाबीमुळे या कारचे उत्पादन बंद करण्यात आले .


   सध्या पेट्रोल, डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने भारतीय लोक आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत .त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची भारतीय ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत .


    भारतामध्ये कमी किंमत असणाऱ्या कारचा खप जास्त आहे .शिवाय भारतामध्ये मध्यम वर्गीय लोकांची कार खरेदी करण्याची इच्छा असते त्यामुळे कमी किंमत असणाऱ्या कारला जास्त मागणी असते .


  फोर्ड या अमेरिकन कार उत्पादक कंपनीने भारतामधील Production युनिट ,भारतामध्ये प्रतिसाद मिळत नसल्याने बंद केला आहे .

Comments