10 वि व 12 वि बोर्ड परीक्षा फीस मिळणार परत .
मागील शैक्षणिक वर्षी 10 वि व 12 वि बोर्ड परीक्षा घेण्यात आली नाही .शाळेच्या अंतर्गत मूल्यमापन द्वारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले होते .त्यामुळे विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा झालीच नाही तर परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी केली जात होती .
उच्च न्यायालय मध्ये जनहित याचिका दाखल केली असता ,उच्च न्यायालयने यावर निर्णय देत बोर्ड परीक्षा फीस परत देण्यासाठी महाराष्ट्र बोर्ड विभागांना सूचना देण्यात आले आहेत .
यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी फीस परत देण्याबाबत असे सांगितले की ,10 वीचे 59 रुपये तर 12 वीचे 94 रुपये परत केले जाणार आहे . हे पैसे शाळेमार्फत विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे .
Comments
Post a Comment