कोरोनाच्या साथीमध्ये मृत्यू झालेल्या नातेवाईकास 50 हजार मिळणार .
कोरोनाच्या महामारी मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहेत .यामध्ये महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या आजारामुळे सुमारे 40 हजार नागरिकांचा मृत्यू झालेला आहे .
या मृत्यू झालेल्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहेत .यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे कोरोनामुळे मृत्यू झाला असणे आवश्यक आहे .शिवाय त्या व्यक्तीचे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असणे आवश्यक .
त्या रुग्णाचा मृत्यू कोरोना रोगाचा उपचार घेताना किंवा उपचार घेऊन घरी 30 दिवसाच्या आत मृत्यू झाला आहे त्याचबरोबर कोरोनाच्या आजारामुळे त्रासून आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास सानुग्रह अनुदान मिळण्यास पात्र असतील .
यासाठी अर्जदाराचा आधार नंबर, बँक पासबुक, इतर नातेवाईकांचा ना हरकत दाखला ,कोविड -19 मुळे मृत्यू पावल्याचे मृत्यू दाखला .हे कागदपत्रे आवश्यक असतील .
शासन निर्णय डाउनलोड करा .
Comments
Post a Comment