Skip to main content

सातवा वेतन आयोगामध्ये आश्वासित प्रगती योजना लाभ अनुज्ञेय बाबत शासन निर्णय.

 सातवा वेतन आयोगामध्ये आश्वासित प्रगती योजना लाभ अनुज्ञेय बाबत शासन निर्णय.

    सातवा वेतन आयोगामध्ये आश्वासित प्रगती योजना लाभ हा 10 ,20 व 30 वर्ष सेवेनंतर अनुक्रमे पहिला ,दुसरा व तिसरा लाभ दिला जाणार आहे .



  जे कर्मचाऱ्यांना 2016 पूर्वी 12 वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ मिळाला आहे त्यांना 8 वर्षांनंतर दुसरा लाभ मिळेल .त्याचबरोबर ज्यांना 24 वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ मिळाला आहे त्यांना सातवा वेतन आयोग मध्ये तिसरा लाभ हा 6 वर्षाच्या म्हणजेच 24+ 6 वर्षानंतर तिसरा लाभ मिळेल .

  सातवा वेतन आयोगामध्ये केवळ वेतनश्रेणी S - 20 पर्यंत वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ होईल .ज्या कर्मचारी /अधिकारीचे वेतनश्रेणी S - 21 होईल त्या कर्मचारी /अधिकारीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही .


   या योजने अंतर्गत एकूण तीन लाभ घेता येईल परंतु ज्या कर्मचारी /अधिकाऱ्याने अगोदरच दोन पदोन्नती घेतल्या आहेत त्यांना एकाच वेळेस या योजनेचा लाभ घेता येईल .
   
  एकाकी पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचारी/अधिकाऱ्यास सेवा कालावधीत एकूण तीन वेळा या योजनेचा लाभ घेता येईल .

खालील लिंक वर क्लिक करून शासन निर्णय डाउनलोड करू शकता .


                     शासन निर्णय

Comments