Skip to main content

मुलींना जॉबसाठी करावे लागते कॉम्प्रमाईज.

 मुलींना जॉबसाठी करावे लागते कॉम्प्रमाईज.

    मुंबई ,पुणे सारख्या ठिकाणी अनेक जॉबच्या संधी उपलब्ध असतात .परन्तु योग्य शैक्षणिक व स्किलच्या पात्रतेनुसार नौकरी मिळत असते .अनेकदा नौकरी मिळते परंतु योग्य पगार मिळत नाही .मुलांना चांगले शिक्षण असले तरी चांगला पगार व नौकरी मिळणे कठीण आहे .



     मुलींच्या बाबतीत नौकरी मिळणे थोडे सोपे आहे .तेवढेच अवघड सुध्दा आहे .योग्य पगार चांगल्या नामांकित ठिकाणी नौकरी मिळणे कठीण असते .मुलींना नौकरीसाठी कॉम्प्रमाईज करावे लागते .मोठ्या शहरांमध्ये कॉम्प्रमाईज हा शब्द खूप परिचित आहे .


    नौकरीसाठी वरिष्ठांकडुन किंवा मालक कडून मुलींसोबत अनुचित प्रकार केले जाते .त्याचबरोबर पगार वाढ करण्यासाठी तसेच प्रमोशनचे लालच देण्यासाठी त्यांच्यासोबत अनुचित प्रकार घडला जातो .महिला सुद्धा निमूटपणे हे सर्व प्रकार सहन करून घेतात कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसतो .


     जर त्या महिलेने सलग 2 ,4 वर्ष काम केल्यास त्या ठिकाणी त्याला पगार वाढ त्याच बरोबर प्रमोशन देने गरजेचे आहे .स्वतः ची भूक भागविण्यासाठी वरिष्ठांकडून किंवा एम्प्लॉयर कडून महिलांचे मानसिक व शारीरिक शोषण केले जाते .


   असे प्रकार घडू नये म्हणून शासनाने कामाच्या ठिकाणी महिलांच्या शारीरिक शोषण होत असल्यास त्या विरुद्ध कडक शिक्षा देण्याचे कायदा लागू करण्यात आला आहे .तरीसुद्धा असे अनेक प्रकार खाजगी कंपनी ,संस्थेमध्ये घडतात .

Comments