Skip to main content

जपानमध्ये बस कर्मचारी संप कसे करतात वाचून आपल्याला लाज वाटेल .

 जपानमध्ये बस कर्मचारी संप कसे करतात वाचून आपल्याला लाज वाटेल .

   सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनि संप केला आहे .हा संप या कर्मचाऱ्यांनि अगोदर महागाई भत्ता मध्ये वाढ करावी यासाठी संप केला .महाराष्ट्र सरकारने महागाई भत्ता 6%वाढ केली त्यामुळे त्यांचा महागाई भत्ता हा 17 % झाला .



    परंतु राज्य शासकीय कर्मचारी यांचा महागाई भत्ता 17 % वरून 28 % करण्यात आला होता. त्यामुळे बस महामंडळ कर्मचारी नाराज होऊन महागाई भत्ता 28 % करण्यासाठी संप केला .ही मागणी सुध्दा मान्य झाली तरीसुद्धा परिवहन महामंडळ कर्मचारी संप कायम ठेवला .मागण्या मागणी होत चालल्याने परिवहन कर्मचारी बस महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी मध्ये सामावून घेण्याची मागणी करू लागले आहेत .हा संप आज 15 दिवसापासून कायम आहे .

   ही भारतीय कामगारांची संप करण्याची मानसिकता आहे .हेच जर जपानमध्ये घडले असते तर जपान मध्ये जेंव्हा बस कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संप करतात त्यावेळेस त्यांच्या मागणी पूर्ण करून घेण्यासाठी प्रवाशांची हाल करत नाहीत .

    तेथील कर्मचारी बस सेवा चालू ठेवतात परन्तु प्रवाशांकडून तिकीट घेत नाहीत यामुळे प्रवाशांचे हाल सुद्धा होत नाहीत व त्यामुळे सरकारचे मोठे नुकसान होते व सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्या सुध्दा ताबडतोब पूर्ण केले जाते .

   जर महाराष्ट्र मध्ये बस कर्मचारी जपानि कर्मचाऱ्यांप्रमाणे संप केला असता तर ,ऐन दिवाळीच्या सणामध्ये प्रवाशांची हाल झाल्या नसत्या .

Comments